खरीप हंगाम धान खरेदीकरिता आजपासून नाेंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:39 AM2021-09-18T04:39:33+5:302021-09-18T04:39:33+5:30

आरमोरी : आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरीप हंगामातील धान विक्रीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नाेंदणी शनिवार, १८ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार ...

Registration for kharif season paddy purchase from today | खरीप हंगाम धान खरेदीकरिता आजपासून नाेंदणी

खरीप हंगाम धान खरेदीकरिता आजपासून नाेंदणी

Next

आरमोरी : आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरीप हंगामातील धान विक्रीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नाेंदणी शनिवार, १८ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी खरीप धान पिकाचा सातबारा निश्चित केंद्रावर सादर करावा, असे आवाहन आरमोरी खरेदी-विक्री संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्हा मार्केटिंग अधिकारी गडचिरोली यांच्या सूचनेनुसार खरीप पणन हंगाम २०२१-२२ चा कालावधी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत राहणार असून, या हंगामातील खरीप धान खरेदी करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे शेतकरी नोंदणी फार्म २ प्रती, सातबारा मूळ प्रत, (भात पेरा २०२१-२२ चा उल्लेख असलेला), नमुना आठ, बँक पासबुक झेराॅक्स प्रत, आधार कार्ड झेराॅक्स प्रत, सामाईक जमीन क्षेत्राकरिता संमतीपत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. सदर कागदपत्रे २९ सप्टेंबरपर्यंत जमा करावीत. नंतर आलेले सातबारा ऑनलाइन पोर्टल स्वीकारणार नाही. त्यामुळे वरील बाबीची नोंद घेऊन शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे ज्या केंद्राला गावे जोडली आहेत त्याच केंद्रावर सादर करावीत, असे कळविले आहे.

आरमाेरी तालुक्यासाठी येथे करावी नाेंदणी

आरमोरी खरेदी केंद्रासाठी आरमोरी, शिवणी (बु.), सायगाव, वघाळा, अरसोडा, रवी, मुलूर, पालोरा, अंतरजी, आष्टा, कासवी, पळसगव, पाथरगोटा, शंकरनगर, जोगीसाखरा, नवरगाव, सालमारा, रामपूर, कनेरी, ठाणेगाव, डोंगरगाव आदी गावांतील शेतकऱ्यांनी १८ पासून संस्थेचे गोदाम गडचिरोली रोड आरमोरी येथे कागदपत्रे जमा करावीत.

वैरागड केंद्रांतर्गत येणाऱ्या वैरागड, पाटणवाडा, वनखी, वासाळा, चामोर्शी माल, कोजबी, इंजेवारी, देऊळगाव, डोंगरसावंगी आदी गावांतील शेतकऱ्यांनी २० सप्टेंबरपासून ग्रामपंचायत कार्यालय वैरागड येथे कागदपत्रे जमा करावीत.

वडधा खरेदी केंद्रांतर्गत येणाऱ्या वडधा, देलोडा (बु.), देलोडा खुर्द, देवीपूर, देशपूर, कुरंझा, बोडधा, बोरी, डार्ली, टेंभाचक, सिर्सी, गणेशपूर, वसा, किटाळी, आकापूर, चुरमुरा, सूर्यडोंगरी आदी गावांतील शेतकऱ्यांनी २० सप्टेंबरपासून ग्रामपंचायत कार्यालय वडधा येथे कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन आरमोरी खरेदी-विक्री संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Registration for kharif season paddy purchase from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.