स्वाक्षरीखाली नोंदणी क्रमांक आवश्यक

By admin | Published: August 3, 2014 11:22 PM2014-08-03T23:22:35+5:302014-08-03T23:22:35+5:30

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्त वेतन योजनेत बोगस लाभार्थ्याचा भरणा दिवसागणीक वाढत आहे़ या योजनेत वयाचे प्रमाणपत्र देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या स्वाक्षरीखाली संपूर्ण नाव,

Registration number is required below the signature | स्वाक्षरीखाली नोंदणी क्रमांक आवश्यक

स्वाक्षरीखाली नोंदणी क्रमांक आवश्यक

Next

बोगस लाभार्थ्यांवर आळा बसणार : वैद्यकीय प्रमाणपत्र देताना डॉक्टरांचे नाव लागणार
देसाईगंज : संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्त वेतन योजनेत बोगस लाभार्थ्याचा भरणा दिवसागणीक वाढत आहे़ या योजनेत वयाचे प्रमाणपत्र देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या स्वाक्षरीखाली संपूर्ण नाव, हुद्या, नोंदणी क्रंमाक ठळक अक्षरात लिहीण्याचा शासनादेश महाराष्ट्र सरकारने काढलेला आहे़ अवैद्यरित्या बोगस वयाचे प्रमाणपत्र देऊन शासनाची लूट करणाऱ्यावर लाभार्थ्यावर यामुळे आळा बसणार आहे़
सर्वसामान्यासाठी कल्याणकारी अशा संजय गांधी निराधार व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत चालविल्या जातात़ कित्येक अपंग व निराधार कुटूंबाला या योजनांमुळे आधार मिळाला आहे़ मात्र या योजनांचा लाभ गरज असलेल्या लाभार्थ्यांना न देता बोगस लाभार्थी घेत असल्याच्या तक्रारी लोकायुक्त महाराष्ट्र सरकार यांच्याकडे प्राप्त झाल्या़ बोगस लाभार्थी हुडकुन काढण्याचा महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे़ वयासबंधी बोगस प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीचाही पर्दाफाश झाला आहे़ त्यामुळे लोकायुक्ताकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार उपलोकायुक्तांनी तयार केलेल्या अहवालातील शिफारसी नुसार संजय गांधी किंवा श्रावणबाळ या योजनेत वयाचे व अपंगाचे प्रमाणपत्र देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वाक्षरी खाली ठळक अक्षरात हुद्या, संपूर्ण नाव, नोंदणी क्रमांक हे न चुकता लिहिण्याचे आदेश दिले आहेत़ तसेच ही योजना चालविणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांना प्रमाणपत्रावर शासनादेशा निर्देशानुसार नोंदी आहेत किंवा नाही याची खात्री करावयाची आहे़ शासनाच्या या निर्णयामुळे या योजनेत बोगसरित्या जाऊ लाभ मिळविणाऱ्या लाभार्थ्यांवर आळा बसेल, अशी आशा आहे. अनेक ठिकाणी राजकीय लोकांनी आपल्या सोयीसाठी लाभार्थ्यांचे निकष डावलून काम केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची चौकशी झाल्यास अनेक जण अडकण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)

Web Title: Registration number is required below the signature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.