श्रावण बाळ याेजनेच्या लाभासाठी ज्येष्ठांची नाेंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:34 AM2021-03-28T04:34:37+5:302021-03-28T04:34:37+5:30
कोरची तालुक्यातील अतिसंवेदनशील भागातील युवक-युवती, वृद्ध, अपंग नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले. ...
कोरची तालुक्यातील अतिसंवेदनशील भागातील युवक-युवती, वृद्ध, अपंग नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये पॅनकार्ड नाेंदणीसाठी १४ लोकांचे फाॅर्म भरून सात लोकांना पॅनकार्ड वाटप केले. तसेच तीन नागरिकांना आधारकार्ड तर नेटवर्कच्या अभावामुळे उर्वरित लोकांचे पॅनकार्ड, आधारकार्ड दुसऱ्या दिवशी काढण्यात आले. याशिवाय तीन अपंग नागरिकांची नावनोंदणी करून महिन्याच्या चौथ्या मंगळवारी कुरखेडा येथे पाठविण्याचे नियोजन कोरची पोलीस स्टेशनमार्फत करण्यात आले. कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरची पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले, पोलीस उपनिरीक्षक रवी मनोहर यांनी हे शिबिर घेतले. यशस्वितेसाठी कोरची पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.