एकल महिलांचे पुनर्वसन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:40 AM2021-08-19T04:40:16+5:302021-08-19T04:40:16+5:30
निवेदनात म्हटले आहे की, काेराेनामुळे पतीचे निधन झाले. मात्र खासगी रुग्णालयाचे माेठ्या प्रमाणात बिल आले. अशाने अनेक महिला कर्जबाजारी ...
निवेदनात म्हटले आहे की, काेराेनामुळे पतीचे निधन झाले. मात्र खासगी रुग्णालयाचे माेठ्या प्रमाणात बिल आले. अशाने अनेक महिला कर्जबाजारी झाल्या. त्या महिलांना तातडीची मदत द्यावी. राज्य सरकारने किमान पाच लाख रुपये या महिलांना देऊन निराधार पेन्शनमध्ये वाढ करावी. व्यवसाय प्रशिक्षण देऊन शून्य टक्के व्याज दराने विनाअट कर्ज द्यावे. अंगणवाडी व सर्व शासकीय भरतीत त्यांना प्राधान्यक्रम द्यावे. तसेच सर्व एकल महिलांसाठी सरकारने धोरण जाहीर करावे, एकल महिलांना संजय गांधी निराधार योजनेतून पेन्शन, बालसंगोपन योजनेत मुलांना मदत, रेशनच्या अंत्योदय योजनेत समावेश, घरकुल व सर्व योजनेत प्राधान्यक्रम द्यावा व १५ व्या वित्त आयोगातून या महिलांसाठी गावपातळीवर खर्च असे आदेश द्यावेत, असे म्हटले आहे. आ. गजबे यांनी सर्व मागण्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. निवेदन जिल्हा निमंत्रक डाॅ. सूर्यप्रकाश गभणे यांनी सादर केले.