जुनी अरतताेंडी गावाचे पुनर्वसन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:36 AM2021-03-10T04:36:27+5:302021-03-10T04:36:27+5:30

जुनी अरततोंडी या गावाची लोकसंख्या सद्यस्थितीत अंदाजे ८०० च्या घरात असून, यापैकी ३०३ नागरिकांनी किन्हाळ्याजवळील पुनर्वसित ठिकाणी स्थलांतर केले ...

Rehabilitation of old Arattaendi village stalled | जुनी अरतताेंडी गावाचे पुनर्वसन रखडले

जुनी अरतताेंडी गावाचे पुनर्वसन रखडले

Next

जुनी अरततोंडी या गावाची लोकसंख्या सद्यस्थितीत अंदाजे ८०० च्या घरात असून, यापैकी ३०३ नागरिकांनी किन्हाळ्याजवळील पुनर्वसित ठिकाणी स्थलांतर केले आहे. येथे घरासाठी व शेतीसाठी देण्यात आलेली जागा निरुपयोगी असल्यामुळे याठिकाणी बांधण्यात आलेल्या घरांना अल्पावधीतच तडे जाऊ लागले आहेत, तर खडकाळ व निरुपयोगी शेतजमिनीमुळे जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सन १९९४ मध्ये लगतच्या गाढवी नदीला आलेल्या पुराने गावाला चारही बाजूंनी वेढल्याने येथील नागरिकांच्या जगण्या- मरण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तत्कालीन स्थिती पाहता या गावाचे किन्हाळ्यानजीक पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याठिकाणी घर बांधकामासाठी ५० बाय ६० स्क्वेअर फूट जागा व २५ हजार रुपये कर्जाऊ स्वरूपात देण्यात आले होते. शेतीसाठी देण्यात आलेली जागा निकृष्ट व निरुपयोगी असल्याचे निदर्शनास आल्याने येथील नागरिकांनी आरमोरी तालुक्यातील पळसगावनजीकच्या बोरकनार या परिसरात घरासाठी व शेतीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली व याठिकाणी पुनर्वसन करण्यास सहमती दर्शवली होती. मात्र, प्रशासकीय यंत्रणेने वन विभागाच्या जागेत पुनर्वसन करण्यास नकार दिला. दरम्यान, नागरिकांनी नवीन ठिकाणी जाण्यास स्पष्ट नकार देत जुन्याच ठिकाणी वास्तव्यास राहून पूर्वापर शेतीच्या भरवशावरच उदरनिर्वाह करीत आहेत.

Web Title: Rehabilitation of old Arattaendi village stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.