विधानसभेला निवांत करा मतदान; जिल्ह्यात नवीन २२ केंद्रांची पडली भर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 03:48 PM2024-10-05T15:48:46+5:302024-10-05T15:49:43+5:30

तिन्ही विधानसभा क्षेत्रात ९७२ बुथ: ८ लाख १४ हजार ८५७ मतदार बजावणार हक्क

Relax the Assembly voting; 22 new centers were added in the district | विधानसभेला निवांत करा मतदान; जिल्ह्यात नवीन २२ केंद्रांची पडली भर

Relax the Assembly voting; 22 new centers were added in the district

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
लोकसभा निवडणुकीत मतदार याद्या अपडेट नसणे, बुथ बदलणे, तसेच अनेकांचे नावच यादीतून गायब झालेले होते. या समस्यांचा सामना मतदारांना करावा लागला. ही स्थिती पुन्हा ओढावू नये यासाठी निवडणूक विभागाने सतर्कता बाळगत मतदार याद्या अपडेट केल्या. जिल्ह्यात यापूर्वी ९५० बुथ होते. त्यात २२ नवीन बुथची भर पडली आहे. आता ही संख्या ९७२ एवढी झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत गोंधळ उडणार नसल्याची निवडणूक विभागाला खात्री आहे. 


भारत निवडणूक आयोगाने दिनांक १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविला होता. यानुसार अंतिम मतदार यादी ३० ऑगस्टला संबंधित विधानसभा क्षेत्रातील सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली तसेच जिल्हा स्तरावरसुद्धा याद्या करण्यात आलेल्या आहेत. स्थानिक स्तरावरील याद्या त्या-त्या बुथमध्ये आहेत. 


विशेष म्हणजे, बीएलओमार्फत स्थानिकस्तरावर पुनरीक्षण कार्यक्रम राबवून नावात बदल, फोटो बदल करणे, नवीन मतदार कार्ड उपलब्ध करून देणे, यासाठी मोहीम राबविण्यात आली होती. 


८,१४,८५७ एकूण मतदार जिल्ह्यात
अंतिम मतदार यादीमध्ये जिल्ह्यातील एकूण ८ लाख १४ हजार ८५७ मतदारांचा समावेश झालेला आहे. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ४ लाख ९ हजार ५४४ आहे, तर महिला मतदार ४ लाख ५ हजार ३०४ एवढे आहेत. ९ मतदार तृतीयपंथी आहेत.


गर्दी टाळण्यासाठी मतदान केंद्र वाढविले
लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक मतदान बुथवर मतदानासाठी गर्दी उसळली होती. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यामुळे मतदारांना त्रास सहन करावा लागला होता. बुथवरील गर्दी टाळण्यासाठी मतदान बुथ वाढविण्यात आलेले आहेत. 


अस्थायी केंद्र नाही 
जिल्ह्यात तीन विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीसाठी एकूण ९७२ मतदान केंद्र राहणार आहेत. हे सर्व मतदान बुथ स्थायी स्वरुपाचे असून जिल्ह्यात एकही अस्थायी बुथ नाही


१५,७१४ नवमतदार 
जिल्ह्यात तरुण मतदारांची संख्या १५ हजार ७७४ आहे. दिव्यांग मतदारांची संख्या ५ हजार ९६३ एवढी आहे. त्यापैकी पुरुष मतदार ३ हजार ६७५ व महिला मतदार २ हजार २८८ आहेत तसेच वयोवृद्ध मतदार ६ हजार ६८६ मतदार आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके यांनी दिली. 

Web Title: Relax the Assembly voting; 22 new centers were added in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.