कत्तलीसाठी जाणाऱ्या ११ गोवंशाची मुक्तता; दोन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:38 AM2021-07-30T04:38:32+5:302021-07-30T04:38:32+5:30
कोरचीमार्गे कुरखेडाकडे येणाऱ्या पिकअप वाहन (एमएच ३६, एए १३०५) मधून गोवंशाची अवैध वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती कुरखेडा ...
कोरचीमार्गे कुरखेडाकडे येणाऱ्या पिकअप वाहन (एमएच ३६, एए १३०५) मधून गोवंशाची अवैध वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती कुरखेडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गोठणगाव नाक्यावर सापळा रचला होता. मध्यरात्री संशयास्पदरीत्या सदर वाहन येताना दिसताच पोलिसांनी ते थांबवत झडती घेतली. यावेळी वाहनात ११ गोवंश दाटीवाटीने कोंबून होते. त्यांची किंमत १ लाख आणि ५ लाख रुपयाचे वाहन असा ६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी वाहन चालक सूरज जुमळे व अमोल कांबळे रा. आंबेडकर वार्ड, मांगली (चौरस) ता.पवनी, जि.भंडारा यांना अटक करण्यात आली. यावेळी वाहन मालक सचिन सोपान खोब्रागडे रा.मांगली याच्याविरोधात गोवंश हत्याबंदी कायदा २०१५ व प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा १९६० च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वाहनातील जनावरे कुरखेडा येथील कोंडवाड्यात ठेवण्यात आली.
ही कारवाई ठाणेदार सुधाकर देडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, हवालदार मनोहर पुराम, प्रेमलाल चौरीकर, केवळराम धांडे, गणेश ठाकूर, नितीन नैताम, देवराव डोंगरे, रुपेश काळबांधे, प्रफुल बेहरे यांनी केली.
290721\img20210729150851.jpg
कोंडवाड्यात बंदिस्त करण्यात आलेले गोवंश