५५ लाखांच्या कामाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:19 AM2018-03-05T00:19:57+5:302018-03-05T00:19:57+5:30
चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत वसंतपूर येथे अर्थ व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार डॉ. देवराव होळी यांच्या स्थानिक विकास निधीतून ५५ लाखांचे विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळ्याचे ......
ऑनलाईन लोकमत
घोट : चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत वसंतपूर येथे अर्थ व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार डॉ. देवराव होळी यांच्या स्थानिक विकास निधीतून ५५ लाखांचे विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. डॉ.देवराव होळी होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे पदाधिकारी तुषार सोम, माजी जि. प. अध्यक्ष रवींद्र ओलालवार, जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के, चामोर्शी पं.स.चे सभापती आनंद भाडेकर, उपसभापती आकुली विश्वास, भाजपच्या बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शाहा, भाजयुमो अध्यक्ष स्वप्निल वरघंटे, दामोदर अरगेला, चामोर्शीचे तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, आनंद गण्यारपवार, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, नरेश अलसावार, वसंतपूर ग्रामंचायतीचे सरपंच तपन सरकार, उपसरंपच बिजली हलदार, विलास चरडूके आदी उपस्थित होते. यावेळी वसंतपूर येथे तुषार सोम यांच्या पत्नी स्वर्गीय युक्ती तुषार सोम असे या चौकाचे नामकरण आले. तसेच यावेळी विकास कामाचे लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी खा. अशोक नेते म्हणाले, बंगाली बांधवांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील असून दोनदा लोकसभेत प्रामुख्याने हा मुद्दा मांडला. राज्याचे अर्थमंत्री मुगंटीवार यांची बैठक लावून सकारात्मक प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले. बंगाली गावाच्या विकासासाठी सुधीर मुंनगंटीवार यांच्या स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येईल. बंगाली बाधवाच्या समस्या सोडविण्याशिवाय स्वस्थ बसणार, असे नेते यांनी सांगितले.
प्रस्ताविक सरंपच सरकार, सचांलन रमेश अधिकारी तर आभार ग्रा.पं. सचिव एम. एम. खरात यांनी मानले.