‘त्या’ तिघांच्या निगेटिव्ह अहवालाने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 05:00 AM2020-06-08T05:00:00+5:302020-06-08T05:00:34+5:30

२७ मे रोजी मुंबई येथून नागपूरपर्यंत विमानाने प्रवास करून पाच प्रवाशी गडचिरोली येथे आले. त्यातील तीन प्रवाशी एका कुटुंबातील व इतर दोन प्रवाशी वेगवेगळ्या कुटुुंबातील आहेत. पाच पैकी चौघांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले होते. एक महिला गरोदर असल्याने तिला गृहविलगीकरणात ठेवले होते. त्यापैकी पती-पत्नीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांच्या पैकीच तिसऱ्या सदस्याचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.

Relief from the negative reports of 'those' three | ‘त्या’ तिघांच्या निगेटिव्ह अहवालाने दिलासा

‘त्या’ तिघांच्या निगेटिव्ह अहवालाने दिलासा

Next
ठळक मुद्देदोन रूग्णांची भर : धानोरा तालुक्यातील दोघे कोरोनापासून झाले मुक्त; एकूण रूग्ण संख्या १५ वर स्थिर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरातील गांधी वार्डातील दोघे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आलेल्या कुटुंबातील एक व्यक्ती शहरात अनेक ठिकाणी फिरला होता. त्यामुळे अनेकांना संसर्ग होण्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे. तसेच त्यांच्यासोबत मुंबईवरून आलेल्या इतर दोघांचाही अहवाल निगेटीव्ह आला आहे.
२७ मे रोजी मुंबई येथून नागपूरपर्यंत विमानाने प्रवास करून पाच प्रवाशी गडचिरोली येथे आले. त्यातील तीन प्रवाशी एका कुटुंबातील व इतर दोन प्रवाशी वेगवेगळ्या कुटुुंबातील आहेत. पाच पैकी चौघांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले होते. एक महिला गरोदर असल्याने तिला गृहविलगीकरणात ठेवले होते. त्यापैकी पती-पत्नीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांच्या पैकीच तिसऱ्या सदस्याचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. विमानात सहप्रवाशी असलेल्या इतर दोघांचाही अहवाल निगेटीव्ह आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तिघांनाही संस्थात्मक विलगीकरणातच ठेवले आहे. इतर ५१ नागरिकांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह गरोदर महिलेच्या संपर्कातील तीव्र जोखमीच्या १७ व मध्यम जोखमीच्या १६ लोकांपैकी तीन नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तिघांचेही अहवाल निगेटिव्ह आहेत. उर्वरित नमुने घेणे सुरू आहे. आजूबाजूच्या घरात तीन मोलकरीन होत्या. सर्व मोलकरीन पॉझिटीव्ह महिलेच्या सानिध्यात आल्या नव्हत्या. मात्र त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून गृह विलगीकरणात ठेवले आहे. गरोदर महिला व तिचा पती यांचा अहवाल जरी पॉझिटीव्ह आला असला तरी सध्या त्यांना कोणतेही लक्षणे नाहीत. त्यांच्यासोबत प्रवास केलेले इतर तिघे निगेटीव्ह आल्याने कोरोना पॉझिटीव्ह दोघांकडून संसर्गाचा धोका ओलांडला असल्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे.

शिवणी खुर्द येथील दोन पॉझिटिव्ह
आरमोरी तालुक्यातील मोहझरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या शिवणी खुर्द येथे आलेल्या पती, पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने या गावात खळबळ माजली आहे. पॉझिटिव्ह आलेले रूग्ण हे मुंबई येथून शिवणी खुर्द येथे परत आले. पती हा मुंबई येथे सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करीत होता. त्याचे वय जवळपास ५० वर्ष आहे. तर पत्नी ४० वर्ष वयाची आहे. ते ३ जून रोजी मुंबईवरून शिवणी खूर्द येथे पोहोचले. त्यांना गावातील शाळेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुसºया दिवशी ४ जून रोजी आरमोरी येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात हलविण्यात आले. ५ जून रोजी त्यांचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविले. ६ जूनच्या रात्री उशिरा त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोघांनाही जिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. जे लोक या दोघांच्या संपर्कात आले त्यांची माहिती घेतली जात आहे. ते ज्या शाळेत थांबले तो परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषीत करण्यात आला आहे. गावात आलेले व्यक्ती पॉझिटीव्ह आढळल्याने शिवणी खुर्द येथील नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. झाड आडवे पाडून गावाकडे जाणारा रस्ता बंद केला.

दोन रूग्ण झाले कोरोनामुक्त
धानोरा तालुक्यातील दोन रूग्णांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला. त्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या २७ वर पोहोचली आहे. सध्या जिल्ह्यात १५ अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

Web Title: Relief from the negative reports of 'those' three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.