रिमझिम सरीने उकाड्यापासून दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:26 AM2021-06-03T04:26:33+5:302021-06-03T04:26:33+5:30
मागील खरीप हंगामात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस झाल्याने पूरग्रस्त शेतकरी वगळता इतरत्र धानाचे जोरदार पीक झाले. पावसाळ्याच्या शेवटच्या नक्षत्रापर्यंत ...
मागील खरीप हंगामात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस झाल्याने पूरग्रस्त शेतकरी वगळता इतरत्र धानाचे जोरदार पीक झाले. पावसाळ्याच्या शेवटच्या नक्षत्रापर्यंत म्हणजे मघा, पूर्वापर्यंत वरुणराजाची कृपा झाल्याने त्या पावसाचा रब्बीलादेखील फायदा झाला. चांगल्या पावसामुळे या वर्षात एप्रिल महिन्यापर्यंत जलसाठे कायम होते. २५ मेपासून रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाली. चांगल्या पावसाचे समजले जाणारे मृगनक्षत्र ८ जूनपासून सुरू होत आहे. या नक्षत्रात पावसाची अनुकूलता दर्शविली आहे. हा काळ शेतकऱ्यांना खरीपपूर्व कामे करण्यासाठी अनुकूल मानला जात असल्याने कामाची लगबग वाढली आहे.
सध्या शेणखत टाकले, बांधावर तुरी लावण्यासाठी माती टाकणे, नांगरणी, वखरणी या मशागतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. बाह्य मशागतीचे काम आटोपल्यानंतर इतर पिकांची पेरणी करणे या कामाला सुरुवात होणार आहे. सध्या बियाणे खरेदी करणे आणि व खरीपपूर्व मशागतीची कामे करण्यासाठी लगबग वाढली आहे.