नाल्यांचा गाळ काढून शेतात टाका
By admin | Published: June 16, 2014 11:31 PM2014-06-16T23:31:30+5:302014-06-16T23:31:30+5:30
आपल्या शेतात असलेल्या शेततळे, बोडी व शेताला लागून असलेल्या सिमेंट, नाला, बांध यामधील गाळ श्रमदानाने काढून तो शेतात टाकावा, यामुळे दुहेरी फायदा होतो. शेतात गाळ टाकल्याने जमीन सुपिक होते
कोरेगाव/चोप : आपल्या शेतात असलेल्या शेततळे, बोडी व शेताला लागून असलेल्या सिमेंट, नाला, बांध यामधील गाळ श्रमदानाने काढून तो शेतात टाकावा, यामुळे दुहेरी फायदा होतो. शेतात गाळ टाकल्याने जमीन सुपिक होते व जातील गाळ काढला जातो. तिथे पाणी साठविण्याची क्षमता वाढते, असा सल्ला शेतकऱ्यांना कृषी विभागाने दिला आहे.
पाण्याची साठवणूक करणे, शेतीची सुपिकता वाढविणे याबरोबरच पिकावर होणाऱ्या विविध रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. मशागतीपूर्वी माती परिक्षण करणे, योग्य बिजाची निवड करणे याबरोबरच बियाणे निर्जुंतीकरण करणे, शेतात खताचे प्रमाण किती ठेवावे, या विषयी माहिती घेणे आदी बाबी शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पूर्वतयारी करतांना लक्षात घेणे आवश्यक आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी नागरिकांनी उपाययोजना करावी. (वार्ताहर)