प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:54 AM2018-09-01T00:54:49+5:302018-09-01T00:55:43+5:30

अहेरी उपविभागातील मरपल्ली परिसरातील अनेक गावातील अतिक्रमणधारकांना वनहक्क पट्टे मिळाले नाही. या गावातील शेतकरी वनहक्कापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना वनहक्क पट्टे द्यावे, अशी मागणी जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्त्वातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

Remove pending claim claims | प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढा

प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढा

Next
ठळक मुद्देअतिक्रमणधारकांची मागणी : ३० वर्षांपासून करीत आहेत शेती; मरपल्ली परिसरातील शेतकरी

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरी उपविभागातील मरपल्ली परिसरातील अनेक गावातील अतिक्रमणधारकांना वनहक्क पट्टे मिळाले नाही. या गावातील शेतकरी वनहक्कापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना वनहक्क पट्टे द्यावे, अशी मागणी जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्त्वातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
अहेरी तालुक्यातील मरपल्ली उमानूर, जोगनगुड्डा, भस्वापूर, करंचा, सुध्दागुडम, सिलमपल्ली, दुबागुडम, छल्लेवाडा, रेपनपल्ली, राजाराम, गोलाकर्जी, झिमेला, देवलमारी, आवलमारी आदी गावातील शेकडो नागरिक वनहक्क पट्ट्यापासून वंचित आहेत. त्यामुळे मागील ३० ते ३५ वर्षांपासून शेती करणाºया शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळत नाही. निवेदन देताना जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार, जि. प. सदस्य अजय नैताम, अहेरीच्या पं. स. सभापती सुरेखा आलाम, पंचायत समिती सदस्य भास्कर तलांडे, मरपल्लीच्या सरपंच सीताबाई वेलादी, माजी सरपंच गंगाराम सडमेक, उमानूरच्या सरपंच ताराबाई आसाम, ग्रा. प. सदस्य बाणका दुर्गे, बबलू शेख, चिरंजीव गंधार्ला, रेपनपली ग्रा. पं. सदस्य विलास बोरकर, दासू कांबळे, बाजीराव आत्राम, हनमंतू ठाकरे, लक्ष्मण जनगाम व नागरिक उपस्थित होते.
मोजमाप करण्याची मागणी
गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून आदिवासी व गैरआदिवासी शेतकरी वन जमिनीवर अतिक्रमण करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. पारंपरिक वननिवासी अधिनियम २००४ नुसार अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप करण्यात आले असून उर्वरित अतिक्रमणधारकांचे दावे स्वीकारून मोजमाप करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

Web Title: Remove pending claim claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.