भामरागडात शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 05:00 AM2020-12-28T05:00:00+5:302020-12-28T05:00:42+5:30

राष्ट्रीय हरीत लवाद यांच्या आदेशानुसार या जागेवर घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राचे काम करणे अत्यावश्यक आहे आणि तसे न झाल्यास नगर पंचायतीला दरमहा १ लाख रुपये आर्थिक दंडाची कार्यवाही हाेऊ शकते. या अतिक्रमणामुळे महाराष्ट्र प्रदुषण मंडळाकडून नगर पंचायतवर ९ लाख रुपये दंडाची नाेटीस बजाविण्यात आली. सदर दंडाबाबत वारंवार सूचना देऊनही या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात येत नव्हती.

Removed encroachment on government land in Bhamragad | भामरागडात शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढले

भामरागडात शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढले

Next
ठळक मुद्देनगर पंचायत प्रशासनाची कारवाई; हरीत लवादाच्या आदेशाचे यंत्रणेकडून पालन

लाेकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने नगर पंचायतीच्या मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही २४ डिसेंबर राेजी करण्यात आली. 
राष्ट्रीय हरीत लवाद यांच्या आदेशानुसार या जागेवर घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राचे काम करणे अत्यावश्यक आहे आणि तसे न झाल्यास नगर पंचायतीला दरमहा १ लाख रुपये आर्थिक दंडाची कार्यवाही हाेऊ शकते. या अतिक्रमणामुळे महाराष्ट्र प्रदुषण मंडळाकडून नगर पंचायतवर ९ लाख रुपये दंडाची नाेटीस बजाविण्यात आली. सदर दंडाबाबत वारंवार सूचना देऊनही या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात येत नव्हती. दरम्यान अतिक्रमण न काढल्यास अतिक्रमणधारकावर आर्थिक दंड लादला जाईल, असे कर व प्रशासकीय अधिकारी आशिष बारसागडे यांनी स्पष्ट केले.
ही कारवाई उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक मनुज जिंदाल यांच्या निर्देशानुसार नगर पंचायतीचे मुख्याधिकारी डाॅ. सुरज जाधव, तहसीलदार अनमाेल कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. उपविभागीय पाेलीस अधिकारी कुणाल साेनवने यांच्यामार्फत पाेलीस बंदाेबस्त पुरविण्यात आला हाेता. यावेळी पाेलीस उपनिरिक्षक तसेच लगतची जमीन वनविभागाची असल्याने वन परिक्षेत्राधिकारी विशाल चव्हाण, व भूमिअभिलेख कार्यालयाचे सुमित लढे उपस्थित हाेते. चाेख पाेलीस बंदाेबस्तात अतिक्रमण हटावची ही कारवाई करण्यात आली.

घनकचरा व्यवस्थापन केंद्र हाेणार
या जागेची निवड ही घनचकरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्रासाठी करण्यात आलेली हाेती. परंतु या जागेवर अनेक वर्षापासून अतिक्रमण करण्यात आले हाेते. अतिक्रमण काढल्याने ही जागा माेकळी झाली असून या जागेवर लवकरच नगर पंचायत प्रशासनातर्फे घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. 

 

Web Title: Removed encroachment on government land in Bhamragad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.