कुनघाडा रै.-जोगणा मार्गाचे नूतनीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:24 AM2021-06-19T04:24:53+5:302021-06-19T04:24:53+5:30

कुनघाडा रै. वरून नवतळा (तु.), भाडभिडी, जोगणामार्गे जाण्यासाठी ५ किमी अंतराचा बायपास रस्ता आहे. सदर रस्ता पायवाट व कच्च्या ...

Renovate Kunghada Rai-Jogana route | कुनघाडा रै.-जोगणा मार्गाचे नूतनीकरण करा

कुनघाडा रै.-जोगणा मार्गाचे नूतनीकरण करा

googlenewsNext

कुनघाडा रै. वरून नवतळा (तु.), भाडभिडी, जोगणामार्गे जाण्यासाठी ५ किमी अंतराचा बायपास रस्ता आहे. सदर रस्ता पायवाट व कच्च्या स्वरूपाचा होता. २००७ मध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, गेल्या १३ ते १४ वर्षांपासून रस्त्याची मर्यादा संपल्यामुळे सध्यातरी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडून गिट्टी बाहेर पडून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात धूळ व खाचखळग्याशी सामना करावा लागत असून, पावसाळ्यात चिखल तुडवत जावे लागते. सदर रस्ता मुरमुरी, येडानूर, पाविमुरांडा रस्त्याला जोडत असल्यामुळे रस्ता रात्रंदिवस चालत असतो. मात्र, रस्त्याची दुरवस्था झाली असल्यामुळे आवागमन करणाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची गंभीर स्थिती लक्षात घेऊन नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी हाेत आहे.

Web Title: Renovate Kunghada Rai-Jogana route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.