वैनगंगा नदीवरील पुलाच्या बेअरींगची रविवारी दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 11:45 PM2019-05-05T23:45:44+5:302019-05-05T23:46:22+5:30

आरमोरी-ब्रह्मपुरी मार्गावरील वैनगंगा नदीवरच्या पुलाचे बेअरींगची दुरूस्ती रविवारी सकाळपासून करण्यात आली. दुरूस्तीसाठी पुलावरून वाहतूक बंद ठेवल्याने नागपूर, ब्रह्मपुरीकडे जाणाऱ्या व्यक्तींना देसाईगंज मार्गाने जावे लागले.

Repair of the bridge over the Wainganga river on Sunday | वैनगंगा नदीवरील पुलाच्या बेअरींगची रविवारी दुरूस्ती

वैनगंगा नदीवरील पुलाच्या बेअरींगची रविवारी दुरूस्ती

googlenewsNext
ठळक मुद्देकाम पूर्ण : देसाईगंज मार्गे वळविण्यात आली वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी-ब्रह्मपुरी मार्गावरील वैनगंगा नदीवरच्या पुलाचे बेअरींगची दुरूस्ती रविवारी सकाळपासून करण्यात आली. दुरूस्तीसाठी पुलावरून वाहतूक बंद ठेवल्याने नागपूर, ब्रह्मपुरीकडे जाणाऱ्या व्यक्तींना देसाईगंज मार्गाने जावे लागले. तर काही दुचाकी व सायकलस्वार नागरिकांनी वैनगंगा नदीतूनच मार्ग काढला.
पुलाचा पिल्लर व वरचा छत यांच्यामध्ये बेअरींग टाकले राहते. या बेअरींगमध्ये बिघाड निर्माण झाला. त्यामुळे बांधकाम विभागाने सदर पुलाची दुरूस्ती करण्याचा निर्णय घेतला. दुरूस्तीसाठी ५ मे हा दिवस निश्चित करण्यात आला. दुरूस्तीसाठी ५ मे रोजी सकाळपासूनच या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली. सदर वाहतूक ६ मे रोजी सकाळपर्यंत बंद राहणार आहे. पुलावरील वाहतूक बंद असल्याने वाहनधारकांना देसाईगंजवरून ब्रह्मपुरीकडे किंवा आरमोरीकडे यावे लागत होते. या मार्गावरच्या बसेस सुध्दा देसाईगंज मार्गाने वळविण्यात आले होते. प्रवास फेºयाचा होत असला तरी एसटी अधिकचे तिकीट घेत नसल्याने प्रवाशांची तक्रार नव्हती. मात्र प्रवासासाठी अधिक वेळ लागत असल्याने प्रवासी त्रस्त झाले.
 

Web Title: Repair of the bridge over the Wainganga river on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी