तुटलेले साईन बोर्ड दुरुस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:57 AM2021-01-08T05:57:27+5:302021-01-08T05:57:27+5:30

पुस्तकसाठा उपलब्ध करण्याची मागणी गडचिराेली : ग्रामीण भागात शासकीय अनुदानावर ग्रंथालये सुरू आहेत. मात्र या ग्रंथालयात पाहिजे त्या प्रमाणात ...

Repair broken sign boards | तुटलेले साईन बोर्ड दुरुस्त करा

तुटलेले साईन बोर्ड दुरुस्त करा

Next

पुस्तकसाठा उपलब्ध करण्याची मागणी

गडचिराेली : ग्रामीण भागात शासकीय अनुदानावर ग्रंथालये सुरू आहेत. मात्र या ग्रंथालयात पाहिजे त्या प्रमाणात ग्रंथसाठा उपलब्ध नाही. ग्रंथालयाला शासनाकडून तोकडे अनुदान मिळत असल्याने त्यांना ग्रंथखरेदीसाठी अडचण जाते. त्यामुळे पुस्तकसाठा उपलब्ध करावा, अशी मागणी आहे.

निधीअभावी कोंडवाडे जीर्णावस्थेत

देसाईगंज : मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र या कोंडवाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे.

स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना त्रास

काेरची : तालुक्यातील ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या गावात स्मशानभूमी उभारावी, अशी मागणी केली जात आहे. पावसाळ्यामध्ये मृतदेह उघड्यावर जाळण्याची वेळ गावकऱ्यांवर येत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सुविधा उपलब्ब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

रेडियमअभावी अपघाताची शक्यता

आरमाेरी : तालुक्यातील अनेक वळण रस्त्यावर रेडियम लावले नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनांची अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक रस्त्यावर रेडियम लावल्यास अपघाताला आळा घालणे शक्य होणार आहे.

शौचालयाअभावी नागरिकांची गैरसोय

धानाेरा : तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयात शौचालयाची व्यवस्था नसल्याने कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शासकीय कार्यालयात नेहमीच अस्वच्छता दिसून येते. याचा परिणाम नागरिक व कर्मचाऱ्यांवरही होत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन शासकीय कार्यालयात शौचालयाची निर्मिती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तलावांची दुरुस्ती करण्याची मागणी

भामरागड : शेजारी असलेल्या अनेक गावांमध्ये तलाव आहेत. मात्र ते दुर्लक्षित असल्यामुळे शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना या तलावांचा पाहिजे तसा उपयोग होत नाही. त्यामुळे या तलावांची दुरुस्ती करून तलावाचे पाणी सिंचनासाठी द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

विद्युत खांबामुळे अपघाताचा धोका

अहेरी : तालुक्यातील काही गावांमध्ये रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खांब बदलविण्याची मागणी केली जात आहे. यापूर्वी खांब बदलविण्याची मागणी नागरिकांकडून केली. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. किमान आतातरी खांब बदलून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सर्पमित्रांना विमाकवच देण्याची मागणी

सिराेंचा : नागरिकांचे प्राण वाचविण्याच्या प्रयत्नात सर्पमित्र स्वत:चे प्राण धोक्यात टाकून सापांना सुरक्षित जंगलात सोडतात. पर्यावरण व वन्यजीवांचे संरक्षण करण्यात सर्पमित्रांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे सर्पमित्रांना विमा लागू करण्याची मागणी सर्पमित्र संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे.

वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

आष्टी : शहरातील वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक जण आपले वाहन रस्त्याच्या कडेला लावत असल्याने काही भागामध्ये वाहतूक कोंडी नित्याचीच झाली. मार्ग काढताना नागरिक त्रस्त होत आहेत.

वर्दळीच्या रस्त्यावर वाढले अतिक्रमण

गडचिराेली : शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. कोरोनानंतर प्रशासनाने शिथिलता दिल्याने वाहने रस्त्यावर धावत आहेत. परंतु, रस्त्याच्या कडेला काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे.

आवश्यक त्या ठिकाणी विद्युत खांब द्या

अहेरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाढीव विद्युत खांब लावून वीज पुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील काही भागात रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.

मुलचेरा शहरात पाळीव डुकरांचा हैदोस

मुलचेरा : तालुका मुख्यालयी पाळीव डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाणही निर्माण केली जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

समाजकल्याण विभागाचे वसतिगृह हवे

आरमोरी : आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे मुलांचे वसतिगृह नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना इतर वसतिगृहांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. मात्र या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे वसतिगृह निर्माण करण्याची गरज आहे.

भरधाव वाहनांवर कारवाई थंडबस्त्यात

आलापल्ली : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यातुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र अनेक वाहनधारक रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने चालवितात. त्यामुळे अनेक अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र प्रशासनाकडून होणारी कारवाई थंडबस्त्यात आहे.

भामरागड तालुक्यातील गावे लाईनमनअभावी

भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे असते. परंतु अनेक गावात लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एका लाईनमकडे चार ते पाच गावे येत असल्यामुळे त्यांना प्रत्येक गावी सारखाच वेळ ते देऊ शकत नाही.

प्रवासी निवाऱ्याला झुडपांचा वेढा

मुलचेरा : तालुक्यातील शांतिग्राम येथे प्रवासी निवारा बांधण्यात आला आहे. मात्र या निवाऱ्याच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. निवाऱ्याला झुडपांनी वेढले आहे. त्यामुळे प्रवासी निवाऱ्यात बसू शकत नाही. उन्हातच बसची वाट बघत बसावे लागते. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाच्या वतीने प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती केली जात नाही.

रिक्त पदांमुळे होतोय कामावर परिणाम

गडचिरोली : स्थानिक तहसील कार्यालयात लिपिकवर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयामार्फत सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र पदे रिक्त असल्याने सदर योजना राबविताना अडचण निर्माण होत आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवरही कामाचा भार वाढला आहे.

आठवडी बाजारात ओट्यांची निर्मिती करा

घोट : चामोर्शी तालुक्यातील घोट येथे मंगळवारी आठवडी बाजार भरतो. परिसरातील शेकडो नागरिक वस्तूच्या खरेदी-विक्रीसाठी बाजारात येतात. मात्र या बाजारात ओट्याची व्यवस्था नसल्याने विक्रेत्यासह ग्राहकांना त्रास होत आहे.

जिल्हा परिषदेसमोर वाढले अतिक्रमण

गडचिरोली : जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूला काही दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. मात्र या दुकानदारांवर कोणतीही कारवाई बांधकाम विभाग तसेच नगर परिषद प्रशासन करीत नसल्याने या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागा पकडून दुकाने थाटली जात आहेत.

काेराेेनाच्या दुसऱ्या लाटेची चिंता

गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यात काही दिवसानंतर कोरोनाची दुसरी लाट आल्यास पुन्हा व्यवहार ठप्प पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेर पडताना याेग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. आराेग्य विभागामार्फत जनजागृती केली जात असली तरी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

Web Title: Repair broken sign boards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.