एटापल्ली-गट्टा मार्ग दुरूस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:01 AM2018-06-01T01:01:56+5:302018-06-01T01:01:56+5:30
एटापल्ली-गट्टा मार्गाची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली आहे. सदर मार्ग दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना तालुका शाखा एटापल्लीच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्ली-गट्टा मार्गाची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली आहे. सदर मार्ग दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना तालुका शाखा एटापल्लीच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे.
सूरजागड पहाडावरून लोहखनिजाची वाहतूक चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस येथे केली जाते. शेकडो ट्रकच्या मध्यमातून लोहखनिजाची वाहतूक होते. विशेष म्हणजे सर्वच ट्रक अतिशय अवजड राहतात. त्यामुळे एटापल्ली ते गट्टा या मार्गाची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. एटापल्ली तालुकास्थळी येण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो. दुर्गम भागात कार्यारत कर्मचारी याच मार्गाने ये-जा करतात. मार्ग उखडला असल्याने दुचाकी, चारचाकी वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. या मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजगोपाल सुल्वावार यांच्यासह पदाधिकाºयांनी एसडीओ यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. मार्ग दुरूस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.