दुर्गम भागातील हातपंपांची केली दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:37 AM2021-05-18T04:37:53+5:302021-05-18T04:37:53+5:30

भामरागड तालुक्यात दरवर्षी उन्हाळ्यात पाणी पातळी खालवत असल्याने काही गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी भामरागड ...

Repair of hand pumps in remote areas | दुर्गम भागातील हातपंपांची केली दुरुस्ती

दुर्गम भागातील हातपंपांची केली दुरुस्ती

Next

भामरागड तालुक्यात दरवर्षी उन्हाळ्यात पाणी पातळी खालवत असल्याने काही गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी भामरागड पं.स.चे हातपंप दुरुस्ती पथक लाॅकडाऊन कलावधीत सुद्धा गावागावांत पोहाेचत आहे. पाणी पातळी खालावलेल्या बोअरवेलमध्ये वाढीव पाइप टाकून दुरुस्ती केली जात आहे. काही गावांमध्ये हातपंपावर सौरऊर्जेवर आधारित दुहेरी नळ योजना कर्यन्वित केलेली आहे. अशा ठिकाणी वारंवार बिघाड येत असल्याचे दिसून येते; परंतु ग्रामपंचायत प्रशासन लक्ष घालत नसल्याने पाणीटंचाई तीव्र हाेते. भामरागड तालुक्यातील कोठी तसेच पदहू, पिडिमिली येथील हातपंप नादुरुस्त असल्याची तक्रार कोठी पोलीस मदत केंद्राला प्राप्त झाली. त्यानुसार पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी यांनी पं.स.ला याबाबत कळविले. त्यानुसार पंचायत समितीचे पथक वेळीच काेठी येथे पाेहाेचून हातपंपाची दुरुस्ती केली.

===Photopath===

170521\17gad_6_17052021_30.jpg

===Caption===

काेठी येथे हातपंपाची दुरुस्ती करताना यांत्रिकी कर्मचारी.

Web Title: Repair of hand pumps in remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.