कृष्णनगर, सोनापूर मायनरची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:40 AM2021-05-25T04:40:48+5:302021-05-25T04:40:48+5:30
चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील कन्नमवार जलाशय कालव्याला जोडलेले कृष्णनगर व सोनापूर मायनरला पाणी सोडल्यानंतर खूप दिवसांनी शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी ...
चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील कन्नमवार जलाशय कालव्याला जोडलेले कृष्णनगर व सोनापूर मायनरला पाणी सोडल्यानंतर खूप दिवसांनी शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपीक पाणी न मिळाल्याने करपते व मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. कारण या दोन्ही मायनरच्या खोलीकरणाचे काम जवळपास पंधरा वर्षांपासून झालेले नाही. त्यामुळे पाटामध्ये आलेला गाळ व कचरा जमा होऊन पूर्णपणे बुजलेले आहे. त्यामुळे खरीप शेती हंगाम सुरू होण्यापूर्वी दोन्ही मायनरच्या खोलीकरणाचे काम करून शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी मिळेल अशी व्यवस्था व उपाययोजना करून पावसाळ्यापूर्वी या दोन्ही मायनरची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामपंचायत उपसरपंच शेषराव कोहळे यांनी केली आहे. या दोन्ही मायनरला जवळपास ७०० हेक्टर शेतीला पाणीपुरवठा होत असतो. त्यामुळे गाळाने बुजलेले पाट व काडीकचरा, वाढलेली झाडे-झुडपे त्याची दुरुस्ती करण्याची मागणी कोहळे यांनी केली आहे.
===Photopath===
240521\img-20210524-wa0054.jpg
===Caption===
गाळामुळे व कचऱ्यामुळे बुजलेले सोनापूर कृष्णानगर मायनर