कोरची तालुक्यातील रस्ते दुरूस्त करा
By admin | Published: February 9, 2016 01:11 AM2016-02-09T01:11:16+5:302016-02-09T01:11:16+5:30
तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या रस्त्यांची दुरूस्ती तत्काळ करण्यात यावी, ...
मुख्यमंत्र्यांना निवेदन : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी
कोरची : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या रस्त्यांची दुरूस्ती तत्काळ करण्यात यावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या कोरची तालुक्यात रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. कोरची ते बोटेकसा (छत्तीसगड सीमेपर्यंत) रस्ता, कोरची ते बेतकाठी-बेतकाठी ते बोरी ते कोटगूल रस्ता, बिहीटेकला फाटा ते कोटरा-महाका रस्ता, कोरची ते जांभळी रस्ता, कोटरा ते मसेली रस्ता, कोरची ते मसेली रस्ता, कैमूल ते धमदीटोला रस्ता, कोटरा ते मिसपिरी, नवरगाव ते भरीटोला, मसेली ते बोंडे-नवझरी, मसेली ते बेलारगोंदी-डाबरी-पड्यालजोब-आंबेखारी ते मुरकुटी-मयालघाट, बिहीटेकला ते अल्लीटोला, सोहले-नांदळी ते जैतानपार, बोटेकसा ते बेतकाठी, कोटगूल ते वाको, बळीमादे ते कोसमी ते अंतरगाव-ठेलकादंड, देऊळभट्टी ते कामेली, पिटेसूर ते कामेली या रस्त्याचे खडीकरण, डांबरिकरण करण्यात यावे, तसेच याच रस्त्यांवर छत्तीसगड सीमेपर्यंत वेगवेगळ्या नद्या व नाल्यांवर पूल बांधकाम करण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आले. कोरची तालुक्यात रस्ते व पुलांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
तहसीलदारांना निवेदन देताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्यामलाल मडावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रतापसिंग गजभिये, रामसुराम काटेंगे, हकीमुद्दीन शेख, जगदीश कुचुरडेहरीया, मनोज अग्रवाल, मेघश्याम जमकातम, प्रेमिला काटेंगे, हर्षलता भैसारे, तुलाराम मडावी, भजन मोहुर्ले, राहुल अंबादे, रूख्मण घाटघुमर, तुळशिराम बावनथडे, झाडूराम सलामे, रामदास कुमरे, बाबुराव मडावी, अनिल कोरेटी, रघुनाथ दरवडे, विठ्ठल शेंडे, गोविंद होळी, जीवन भैसारे, सुनील मडावी आदी उपस्थित होते.
१५ हजार रूपये एकरी मदत द्या
कोरची तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून एकरी १५ हजार रूपये आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी तसेच स्वामीनाथन आयोग लागू करावा, नरेगा व रोहयोचे काम तत्काळ सुरू करावे, कोटरा खरेदी केंद्र सुरू करावे आदींसह २३ मागण्यांचा समावेश आहे.