बदली यादी प्रसिद्धीस विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:32 PM2018-05-29T23:32:32+5:302018-05-29T23:32:44+5:30

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीची यादी रविवारी रात्रीच जिल्हा परिषदेला उपलब्ध झाली. मात्र दोन दिवसांचा कालावधी उलटूनही सदर यादी प्रसिध्द करण्यात आली नाही. त्याचबरोबर विस्तापीत झालेल्या ४३० शिक्षकांचीही नावे जाहीर करण्यात आली नाही.

Repeat list publicity delay | बदली यादी प्रसिद्धीस विलंब

बदली यादी प्रसिद्धीस विलंब

Next
ठळक मुद्देउत्कंठा कायम : ४०० शिक्षक ठरले विस्थापित

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीची यादी रविवारी रात्रीच जिल्हा परिषदेला उपलब्ध झाली. मात्र दोन दिवसांचा कालावधी उलटूनही सदर यादी प्रसिध्द करण्यात आली नाही. त्याचबरोबर विस्तापीत झालेल्या ४३० शिक्षकांचीही नावे जाहीर करण्यात आली नाही.
शिक्षकांची यादी ग्राम विकास मंत्रालयातून सर्व प्रथम जिल्हा परिषदेला पाठविली जाते. सीईओंचे सही झाल्यानंतर सदर यादी तत्काळ त्याच दिवशी गट शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविणे आवश्यक होते. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या यादीवर सोमवारी व मंगळवारी दिवसभर सहीच केली नाही. मंगळवारी सायंकाळी सही झाल्यानंतर सदर आदेश बीओंना पाठविण्यात आले. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी उशीरापर्यंत बदली झालेल्या शिक्षकांची यादी जाहीर झाली नव्हती. त्यामुळे त्यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे.
ज्या शिक्षकांनी पसंतीक्रम दर्शविलेल्या २० शाळा मिळाल्या नाहीत. त्यांना विस्थापीत शिक्षक म्हणून घोषीत करण्यात येते. गडचिरोली जिल्ह्यात ३६४ प्राथमिक शिक्षक, ४४ पदवीधर, दोन उच्च श्रेणी मुख्याध्यापक असे एकूण ४०० शिक्षक विस्थापीत ठरले आहेत. त्यांना पुन्हा शाळेची निवड करण्याची संधी दिली जाणार आहे. याबाबतचे पोर्टल मंगळवारी सकाळपासून सुरू झाले. ३१ मे ही शेवटची तारीख आहे. म्हणजेच शिक्षकांना केवळ दोन दिवसांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे शिक्षकांना बरीच धावपळ करावी लागणार आहे. त्यातही काही तांत्रिक अडचणी आल्यास शिक्षकांना पुन्हा शाळेची निवड करण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. प्रभारी शिक्षणाधिकारी उरकुडे हे मात्र विस्थापीतांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळेल, याचा अंदाज बांधत आहेत. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या बदल्या सुरू आहेत. यामध्ये सीईओ व्यस्त आहेत. ते नवीन असल्याने त्यांना योग्य मार्गदर्शन करून बदली यादीवर सही करून ती बीओंकडे पाठविण्याची विनंती शिक्षण विभागाने करणे आवश्यक होते. मात्र असे झाले नाही.

Web Title: Repeat list publicity delay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.