स्वच्छता अ‍ॅपद्वारे तक्रारी नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:26 PM2017-12-12T23:26:07+5:302017-12-12T23:27:14+5:30

नागरिकांच्या स्वच्छताविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी व शहराला गोदरीमुक्त करून स्वच्छता अभियानात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी स्थानिक नगर परिषदेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता अ‍ॅप उपलब्ध करून दिले.

Report a complaint through the cleanliness app | स्वच्छता अ‍ॅपद्वारे तक्रारी नोंदवा

स्वच्छता अ‍ॅपद्वारे तक्रारी नोंदवा

Next
ठळक मुद्देनगराध्यक्षांचे आवाहन : गडचिरोली नगर परिषदेत उद्घाटन

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : नागरिकांच्या स्वच्छताविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी व शहराला गोदरीमुक्त करून स्वच्छता अभियानात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी स्थानिक नगर परिषदेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता अ‍ॅप उपलब्ध करून दिले. सदर स्वच्छता अ‍ॅप नागरिकांनी आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून अस्वच्छतेबाबतच्या तक्रारी या अ‍ॅपद्वारे नोंदवाव्या. प्राप्त तक्रारीचे तत्काळ निवारण करण्यात येईल, असे आवाहन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत न. पं. च्या वतीने पालिकेच्या सभागृहात मंगळवारी स्वच्छता अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर पालिकेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पाणीपुरवठा सभापती केशव निंबोळ, नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, पोलीस निरीक्षक संजय सांगोळे, नगरसेविका रितू कोलते, अल्का पोहणकर आदी उपस्थित होत्या.
घंटागाडी, मृत जनावरे, वीज जोडणी, रस्ते सफाई, कचरा तसेच सार्वजनिक शौचालय आदीबाबतच्या तक्रारी या अ‍ॅपवर नोंदविता येणार आहे, असे नगराध्यक्ष पिपरे यांनी सांगितले. याप्रसंगी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पाणीपुरवठा सभापती केशव निंबोळ यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी न. प. कर्मचारी हजर होते.
नगरसेवकांची पाठ
गडचिरोली नगर पालिकेत भाजपची एकहाती सत्ता असून या पक्षाचे एकूण २३ नगरसेवक आहेत. इतर पक्षाचे केवळ दोन नगरसेवक असल्याने विरोधक उरलेच नाही. मात्र सदर स्वच्छता अ‍ॅप कार्यक्रमाला निमंत्रणपत्र देऊनही स्वपक्षाच्याच नगरसेवकांनी पाठ फिरविली. सदर कार्यक्रमाला न. प. पदाधिकाऱ्यांसह पाच नगरसेवक उपस्थित होते. समन्वय व नियोजनाचा अभाव असल्याने नगरसेवकांनी या कार्यक्रमाला दांडी मारल्याची चर्चा शहरात आहे. स्वच्छता व विकासाच्या मुद्यावर नगरसेवकांना एकत्र आणने गरजेचे आहे.

Web Title: Report a complaint through the cleanliness app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.