रिपब्लिकन पक्षाची युवा कार्यकर्ता बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:40 AM2021-09-06T04:40:19+5:302021-09-06T04:40:19+5:30
बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक खंडारे होते. प्रमुख अतिथी म्हणून संपादक करण मेश्राम, युवा आघाडीचे सरचिटणीस पुण्यवान सोरते, स्टुडंट ...
बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक खंडारे होते. प्रमुख अतिथी म्हणून संपादक करण मेश्राम, युवा आघाडीचे सरचिटणीस पुण्यवान सोरते, स्टुडंट फेडरेशनचे प्रदेश सरचिटणीस संदीप रहाटे, जिल्हा सरचिटणीस धर्मेंद्र वंजारे, गडचिरोली शहर अध्यक्ष अनिल बारसागडे, चामोर्शी तालुका अध्यक्ष अमोद दुर्गे आदी उपस्थित होते.
या बैठकीत युवकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व ठराव संमत करण्यात आले. सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण बंद करण्यात यावे, शिक्षण संस्था सुरू कराव्यात, वनोपजावर आधारित उद्योग सुरू करावेत, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीतील आरक्षण सुरू ठेवावे, बेरोजगार युवकांना उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज द्यावे, ओबीसी आरक्षण पूर्ववत करावे, गोंडवाना विद्यापीठात कुलगुरूंची नियुक्ती करावी आदी मागण्यांचा त्यात समावेश होता.
या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, प्रदेश उपाध्यक्ष कुलपती मेश्राम, जिल्हा सरचिटणीस हंसराज उंदीरवाडे, कार्यालयीन सचिव अशोक खोब्रागडे, तालुका अध्यक्ष प्रल्हाद रायपुरे, तुलसीदास नंदेश्वर आदींनी भेट दिली.
यशस्वीतेसाठी युवक आघाडीचे तेजल झाडे, अमित टेकाम, भगवान बैसारे, प्रेमदास झाडे, विकास उंदीरवाडे, ढिसू ढवळे, जितू झाडे, ओमप्रकाश साखरे, कौशिक उंदीरवाडे, पुरुषोत्तम जांभूळकर, जनदेव मेश्राम, देवेंद्र मेश्राम व कार्यकर्ते उपस्थित होते.