बाैद्ध प्रमाणपत्र देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:25 AM2021-07-16T04:25:46+5:302021-07-16T04:25:46+5:30
मागील अनेक दिवसांपासून बौध्द प्रमाणपत्रासाठी सेतू केंद्रात जाणाऱ्यांना असे प्रमाणपत्र शक्य नाही, म्हणून परत पाठविले जात होते. पर्यायाने त्यांना ...
मागील अनेक दिवसांपासून बौध्द प्रमाणपत्रासाठी सेतू केंद्रात जाणाऱ्यांना असे प्रमाणपत्र शक्य नाही, म्हणून परत पाठविले जात होते. पर्यायाने त्यांना जुनेच जातीचे प्रमाणपत्र दिले जात होते. ही बाब दि बुध्दिस्ट सोसायटीचे तालुका कार्याध्यक्ष धनंजय मेश्राम यांनी लक्षात आणून दिल्यानंतर जिल्हा प्रवक्ते विजय बन्सोड यांच्या नेतृत्वात बौध्द प्रमाणपत्र मिळण्यासाठी एसडीओंना भेटून निवेदन देण्यात आले. यामुळे अंकुश धनंजय मेश्राम यांना एसडीओंच्या निर्देशानुसार बौध्द प्रमाणपत्र देण्यात आले असून, इतरांसाठीही आता हा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जुन्या जातीचे प्रमाणपत्र घेऊ नये, असे आवाहन दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात येत आहे. निवेदन देताना दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अभियंता नरेश मेश्राम, जिल्हा मुख्य संघटक हंसराज लांडगे, जिल्हा प्रवक्ते विजय बन्सोड, कोषाध्यक्ष मारोती रामटेके, तालुका अध्यक्ष नागोराव ऊके, कार्याध्यक्ष धनंजय मेश्राम आदी उपस्थित होते.
140721\442014gad_2_14072021_30.jpg
एसडीओ विशाल मेश्राम यांना निवेदन देताना पदाधिकारी.