काेराेनातून बचावले; आवश्यक शस्त्रक्रिया कधी करायची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:35 AM2021-09-13T04:35:53+5:302021-09-13T04:35:53+5:30

गडचिराेली : विविध प्रकारचे पाेटाचे विकार व अन्य शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असतानाच अचानक काेराेनाचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर शस्त्रक्रिया करायचे ...

Rescued from Kareena; When to perform the necessary surgery? | काेराेनातून बचावले; आवश्यक शस्त्रक्रिया कधी करायची?

काेराेनातून बचावले; आवश्यक शस्त्रक्रिया कधी करायची?

Next

गडचिराेली : विविध प्रकारचे पाेटाचे विकार व अन्य शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असतानाच अचानक काेराेनाचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर शस्त्रक्रिया करायचे राहून गेले. असा प्रश्न अनेक रूग्णांना सध्या भेडसावत आहे. अनेकजण आराेग्य तज्ज्ञांकडून वैद्यकीय सल्लाही घेत आहेत. परंतु काेराेनाच्या लक्षणातून पूर्णत: मुक्त झाल्यानंतरच म्हणजेच हाेम आयसाेलेशनचा संपूर्ण कालावधी संपल्यानंतरच आवश्यक शस्त्रक्रिया करता येणार, असा सल्ला तज्ज्ञ डाॅक्टर देतात. काेराेनातून मुक्त झाल्यानंतर विविध विकार व बाह्य शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असलेल्या सर्वसाधारण रुग्णांना शस्त्रक्रिया करणे अवघड नाही, परंतु अतितत्काळ शस्त्रक्रियांसाठी अनेक अडचणी येऊ शकतात.

बाॅक्स .....

शस्त्रक्रियेसाठी रिकव्हर हाेण्याची वाट पाहा....

काेराेनाचा संसर्ग कधी व काेणाला हाेईल, हे सांगता येत नाही. यासाठी याेग्य खबरदारी व उपाययाेजना करून वर्तन केल्यास काेराेनाचा संसर्ग टाळता येताे. काही दिवसांत शस्त्रक्रिया करावयाची असल्यास व खबरदारी घेऊनही काेराेनाचा संसर्ग झाल्यास शस्त्रक्रियेसाठी किमान पूर्णत: काेराेना लक्षणमुक्त हाेईपर्यंत प्रतीक्षा करावी लागते.

बाॅक्स ....

इमर्जन्सी शस्त्रक्रिया

गराेदर महिलांची बाळंतपणादरम्यानची शस्त्रक्रिया, अल्सर फुटणे, पाेट फुगणे यांसारख्या इमर्जन्सी शस्त्रक्रिया असतात. या शस्त्रक्रिया मात्र वेळेतच याेग्य खबरदारी घेऊन करणे आवश्यक असते. त्यांची मुदत वाढविणे धाेक्याचे असते.

बाॅक्स ....

प्लान शस्त्रक्रिया

एखाद्या व्यक्तीचा विकार सर्वसाधारण असेल किंवा शस्त्रक्रिया काही दिवस पुढे ढकलता येत असेल, तर पूर्णत: काेराेनामुक्त झाल्यानंतर शस्त्रक्रिया करता येऊ शकते. यासाठी अतिघाई न केलेलीच बरी.

काेट .......

काेराेनाबाधित रुग्णातील लक्षणे पूर्णत: दूर झाल्यानंतरच आवश्यक असलेल्या इतर आजारांच्या शस्त्रक्रिया करता येऊ शकतात, परंतु अत्यावश्यक शस्त्रक्रियेबाबत त्यावेळची रुग्णाची स्थिती व अवस्था पाहूनच शस्त्रक्रिया करावी लागते.

- डाॅ.माधुरी किलनाके, शल्य चिकित्सक तथा सर्जन, गडचिराेली.

Web Title: Rescued from Kareena; When to perform the necessary surgery?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.