निवासी शाळेतील विद्यार्थिनी परतल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:16 AM2019-07-25T00:16:10+5:302019-07-25T00:16:37+5:30

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत चालविणाऱ्या जाणाºया सिरोंचा येथील शासकीय अनुसूचित जाती (नवबौद्ध) निवासी शाळेतील दुरावस्थेला कंटाळून विद्याथिनिंनी चार दिवसांपूर्वी वसतीगृह सोडून घरी निघून गेल्या होत्या. सोयीसुविधा पुरविण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.

Residential school students returned | निवासी शाळेतील विद्यार्थिनी परतल्या

निवासी शाळेतील विद्यार्थिनी परतल्या

Next
ठळक मुद्देसिरोंचा येथील वस्तीशाळा : इतर मुलींना वापस आणण्याचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत चालविणाऱ्या जाणाºया सिरोंचा येथील शासकीय अनुसूचित जाती (नवबौद्ध) निवासी शाळेतील दुरावस्थेला कंटाळून विद्याथिनिंनी चार दिवसांपूर्वी वसतीगृह सोडून घरी निघून गेल्या होत्या. सोयीसुविधा पुरविण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. तसेच महिला अधिक्षिकेचीही नियुक्ती केली. त्यानंतर ४३ विद्याथिनी वसतीगृहात परतल्या आहेत.
सिरोंचातील अनुसूचित जाती मुलींच्या शाळेत वसतिगृहाची व्यवस्था आहे. सोबत भोजनही दिले जाते. पण गेल्या आठवडाभरापासून निकृष्ट जेवण दिले मिळत होते. या शाळेत १९ पदांची मंजुरी आहे. यातील बहुतांश पदांवर महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे. परंतू १९ पैकी केवळ ५ पदे भरलेली असून उर्वरित १४ पदे रिक्तच आहेत. भरलेल्या ५ पदांमध्ये एकही महिला कर्मचारी नाही हे विशेष.सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही मुलींच्या वसतिगृहात अधीक्षकाचे पद हे महिलेकडेच असणे आवश्यक आहे. परंतू गेल्या सहा वर्षात हे पदच भरण्यात आले नव्हते.
या शाळेत ६ ते १० पर्यंत वर्ग असून एकूण १७४ विद्यार्थिनी होत्या. परंतू गेल्या आठ दिवसांपासून निकृष्ट भोजन मिळत असल्याने आणि कोणीही महिला कर्मचारी किंवा अधीक्षक नसल्यामुळे विद्यार्थिनींनी या शाळेतून बाहेर पडल्या होत्या. विद्याथिनिंनी वसतीगृह सोडल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर प्रशासनात एकच खळबळ माजली होती. त्यानंतर या वसतीगृहात तत्काळ महिला अधिक्षकाची नेमणूक केली आहे. काही विद्यार्थिनी अजूनही परतल्या नाहीत. त्यांना परत आणण्याचे आव्हान वसतीगृह प्रशासनासमोर आहे. विद्यार्थिनींना आणण्यासाठी त्यांची पालकांची मनधरणी करावी लागणार आहे.

Web Title: Residential school students returned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा