शिपाई पदभरतीतून डावलण्याचा डाव

By Admin | Published: July 29, 2014 11:49 PM2014-07-29T23:49:21+5:302014-07-29T23:49:21+5:30

तालुक्यातील चांभार्डा ग्रामपंचायत अंतर्गत रिक्त असलेल्या शिपाई पदाची अनुसूचित जातीची जागा भरण्यासंदर्भात ग्रा. पं. च्यावतीने फेब्रुवारी महिन्यात आवेदनपत्र मागविले होते. परंतु सदर शिपाई भरती

Resignation | शिपाई पदभरतीतून डावलण्याचा डाव

शिपाई पदभरतीतून डावलण्याचा डाव

googlenewsNext

कैलास कोरेवार यांचा आरोप : चांभार्डा ग्रा. पं. ने दुसऱ्यांदा मागविले आवेदन पत्र
गडचिरोली : तालुक्यातील चांभार्डा ग्रामपंचायत अंतर्गत रिक्त असलेल्या शिपाई पदाची अनुसूचित जातीची जागा भरण्यासंदर्भात ग्रा. पं. च्यावतीने फेब्रुवारी महिन्यात आवेदनपत्र मागविले होते. परंतु सदर शिपाई भरती प्रक्रियेत ग्रामसेवकाची मनमानी झाल्याच्या आरोपावरून सदर शिपाई पदभरती प्रक्रिया काही दिवस स्थगीत ठेवण्यात आली. परंतु आता सर्वसाधारण प्रवर्गातून सरळ भरतीने रिक्त असलेले शिपायाचे पद भरण्यासंदर्भात आवेदनपत्र मागविण्यात आले आहे. त्यामुळे अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी ग्रामपंचायतच्या ठरावानुसार राखीव असलेले शिपायाचे पद पुन्हा सर्वसाधारण प्रवर्गातून भरले जात आहे. त्यामुळे सदर भरती प्रक्रियेपासून अनुसूचित जातीच्या उमेदवारांना डावलण्याचा ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप कैलास कोरेवार यांनी केला आहे.
चांभार्डा येथील ग्रा. पं. मधील पदोन्नतीने रिक्त झालेले शिपायाचे पद भरण्यासंदर्भात ७ फेब्रुवारी २०१४ पर्यंत अनुसूचित जाती संवर्गातून आवेदनपत्र मागविण्यात आले होते. त्यानंतर गावातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसह इतरही उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. परंतु ग्रामसेवकाने अनुसूचित जातीच्या ५ उमेदवारांना आकसापोटी अपात्र घोषित केले होते. त्यामुळे अन्यायग्रस्त अनुसूचित जातीच्या उमेदवारांनी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्याकडे २४ फेब्रुवारी रोजी शिपाई पद भरतीत ग्रामसेवकाने केलेल्या अन्यायाचे निवारण करण्यासंदर्भात निवेदन सादर केले होते. ग्रामपंचायत सचिवाने अनुसूचित जातीचे उमेदवार उपलब्ध असतांनासुद्धा अन्य उमेदवाराची निवड रद्द करून शिपाई पदभरती प्रक्रिया अनुसूचित जाती संवर्गातूनच पुन्हा घेण्यात यावी, याबाबत विनंतीही सीईओकडे केली होती.
बेकायदेशिर व नियमबाह्य ग्रामसेवकावर उचित कारवाई करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे चांभार्डा येथील अनुसूचित जातीच्या उमेदवारांनी केली होती. परंतु चांभार्डा ग्रा. पं. च्यावतीने शिपाई पदाच्या भरतीकरिता २ आॅगस्ट २०१४ पर्यंत सर्वसाधारण प्रवर्गातून आवेदनपत्र मागविण्यात आले आहे. त्यामुळे ग्रा. पं. ने शिपाई पदाच्या भरतीकरिता पूर्वी घेतलेला अनुसूचित जाती उमेदवाराची भरती करण्याचा ठराव असतांनाही अनुसूचित जातीच्या उमेदवारांना शिपाई पदापासून वंचित ठेवण्याचा ग्रामसेवकाचा डाव असल्याचा आरोप कोरेवार यांनी केला आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले जाईल, असे कैलास कोरेवार यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.

Web Title: Resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.