वृक्षतोडीला विरोध कायमच

By admin | Published: June 1, 2016 01:59 AM2016-06-01T01:59:41+5:302016-06-01T01:59:41+5:30

वडसा वन विभागातील १२ गावांतील नागरिकांचा वन विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या वृक्षतोडीला विरोध कायम होता.

Resistance to the tree | वृक्षतोडीला विरोध कायमच

वृक्षतोडीला विरोध कायमच

Next

चर्चा फिस्कटली : अध्यक्ष व महाव्यवस्थापकांची उपस्थिती
देसाईगंज : वडसा वन विभागातील १२ गावांतील नागरिकांचा वन विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या वृक्षतोडीला विरोध कायम होता. यावर तोडगा काढण्यासाठी वन विकास महामंडळ ब्रह्मपुरीमार्फत देसाईगंज येथे नागरिकांचे चर्चासत्र बोलाविण्यात आले. मात्र या चर्चासत्रात एफडीसीएमचे पदाधिकारी व अधिकारी ग्रामस्थांची समजूत काढण्यात अपयशी ठरल्याने सदर चर्चा फिस्कटली. एफडीसीएमकडून होणाऱ्या वृक्षतोडीला या १२ गावातील नागरिकांचा विरोध अद्यापही कायमच असल्याचे या चर्चासत्रात दिसून आले.
वडसा वन विभागाच्या सभागृहात मंगळवारी आयोजित चर्चासत्राला वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, उत्तर वनवृत्ताचे महाव्यवस्थापक एस. एस. डोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष किसन नागदेवे, नाना नाकाडे, मोतीलाल कुकरेजा, पं. स. सभापती प्रीती शंभरकर, शालू दंडवते, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, उपवनसंरक्षक होशिंग, राजपूत तसेच एफडीसीएम विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे हिरामन घराटे यांच्यासह प्रदीप बोडणे, विजय बुल्ले, उमराव हरगुळे, डॉ. वालदे, गुणवंत दडमल, काशिनाथ नारनवरे आदी उपस्थित होते.याप्रसंगी हिरामन घराटे, सुरेंद्रसिंह चंदेल, किसन नागदेवे यांनी लोकांच्या समस्या एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
दरम्यान वन विकास महामंडळामार्फत प्रोजेक्टरद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली. मात्र एफडीसीएमचे अधिकारी, पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व १२ गावांतील नागरिकांमध्ये समेट घडून न आल्याने सदर चर्चा फिस्कटली. प्रास्ताविक उपवनसंरक्षक राजपूत, संचालन कापसे यांनी केले तर आभार बिऱ्हाडे यांनी मानले. (वार्ताहर)

Web Title: Resistance to the tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.