चार गावांत दारूमुक्तीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 01:22 AM2019-03-23T01:22:13+5:302019-03-23T01:23:27+5:30

लोकसभा निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथद्वारे व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून भामरागड तालुक्यातील जिंजगाव, मरपल्ली, चिचोडा व इरकडुम्मे या गावांमध्ये मंगळवारी मुक्तिपथ गाव संघटनांची बैठक घेऊन ही निवडणूक दारूमुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले.

Resolution of redemption in four villages | चार गावांत दारूमुक्तीचा संकल्प

चार गावांत दारूमुक्तीचा संकल्प

Next
ठळक मुद्देमुक्तिपथ अभियान : निवडणूक प्रक्रियेदरम्यान घेणार विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : लोकसभा निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथद्वारे व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून भामरागड तालुक्यातील जिंजगाव, मरपल्ली, चिचोडा व इरकडुम्मे या गावांमध्ये मंगळवारी मुक्तिपथ गाव संघटनांची बैठक घेऊन ही निवडणूक दारूमुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. ही दारूबंदी टिकून राहावी आणि दारूची विक्री करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी मुक्तिपथ उपक्रमाद्वारे व्यापक प्रयत्न केले जात आहे. यांतर्गत अनेक गावांनी दारूविक्रीबंदीचे ठराव घेऊन गावातील दारूविक्री टिकवून ठेवली आहे. पण निवडणूक काळात मतदारांना दारूचे आमिष दाखवून मते आपल्या पारड्यात पाडून घेण्याचा प्रयत्न काही उमेदवार करीत असतात. अशा उमेदवारांच्या आमिषाला बळी न पडता ही निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी काय करता येईल यासाठी तालुका मुक्तिपथ चमुद्वारे जिंजगाव, मरपल्ली, चिचोडा व इरकडुम्मे या गावांमध्ये मार्गदर्शन बैठक घेण्यात आली. गावातील दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी ही निवडणूक दारूमुक्त निवडणूक असा निर्धार करण्याचे आवाहन गावकऱ्यांना करण्यात आले. त्याचबरोबर मतदान करणे हा प्रत्येकाचा अधिकार आणि कर्तव्य आहे. त्यामुळे तो प्रत्येकाने पूर्ण शुद्धीत राहून बजावावा, असेही आवाहन करण्यात आले. ही निवडणूक दारूमुक्त करण्याचा निर्धारही या गावांनी केला.
जिंजगाव येथे बैठकीला सामाजिक कार्यकर्ते सीताराम मडावी, सुरेश मडावी, ग्रामसभा अध्यक्ष, पेसा अध्यक्ष, गावसंघटनेचे पदाधिकारी, गावकरी व महिला उपस्थित होत्या. इरकडुम्मे येथे माजी सरपंच चैतू आत्राम, पेसा अध्यक्ष राजू मुर्रा आत्राम, रामधन एक्का, आशास्वयंसेविका मीना चैतू आत्राम व ग्रामस्थ उपस्थित होते. मरपल्ली येथे पेसा अध्यक्ष सुरेश येर्रा मडावी, दिनेश तोडसाम व गावकरी उपस्थित होते. चिचोडा येथे पोलीस पाटील सीताराम नैताम, पेसा अध्यक्ष बाबुराव मडावी, बुधू नैताम व गावकरी उपस्थित होते.

Web Title: Resolution of redemption in four villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.