ओबीसींचे प्रश्न निकाली काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:34 AM2021-02-07T04:34:33+5:302021-02-07T04:34:33+5:30
या संदर्भात गाेंडवाना विद्यापीठात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले व त्यांच्याशी चर्चा ...
या संदर्भात गाेंडवाना विद्यापीठात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले व त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. तसेच राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, मदत, पुनर्वसन व बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.
ओबीसींचे प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावेत, यासाठी गडचिराेली जिल्हा ओबीसी संघटना समन्वय समितीच्या वतीने सोमवारी (दि. २२) १ लाख ओबीसींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर महामाेर्चा काढण्यात येणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
.........................................
बाॅक्स...
निवेदनातील प्रमुख मागण्या
सन २०२१ च्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश करू नये, ओबीसी प्रवर्गाचे वर्ग ३ व ४ च्या पदासाठी गडचिराेली, चंद्रपूर, यवतमाळ, नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे व पालघर या जिल्ह्यांतील कमी केलेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावात गैरआदिवासींची लाेकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशी गावे अनुसूचित क्षेत्रातून वगळण्यात यावी, गडचिराेली येथील कृषी महाविद्यालय व आयटीआयमध्ये ओबीसीसाठी वाढीव जागा देण्यात याव्या, गाेंडवाना विद्यापीठातील वर्ग ३ व ४ ची पदभरती ओबीसींच्या १९ टक्के आरक्षणाद्वारे करण्यात यावी, आदींसह विविध मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे.