रेगुंठा परिसरातील समस्या सोडवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 01:29 AM2018-10-13T01:29:47+5:302018-10-13T01:30:08+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी आविसंचे संघटन गावागावांत मजबूत करण्यावर भर द्यावा, आविसंच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करावा.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी आविसंचे संघटन गावागावांत मजबूत करण्यावर भर द्यावा, आविसंच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करावा. रेगुंठा परिसरात असलेल्या विविध मूलभूत समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिले.
तालुक्यातील मोयाबीनपेठा येथे आदिवासी विद्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांची बैठक जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
मोयाबिनपेठाचे उपसरपंच संतोष जाकावार यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीला आविसं ज्येष्ठ नेते मंदा शंकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व माजी उपसभापती आकुला मल्लिकार्जुनराव, आविसं तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, आविसं सल्लागार रवी सल्लमवार, तुमनुरचे उपसरपंच किरणकुमार वेमुला, मोयबिनपेठाचे सरपंच कमला आलाम, उपसरपंच वेंकटी तोडसाम, मदनय्या कोडापे, संतोष जाकावार, राजेश तोगरी, कोला बापू, स्वामी पोलमपल्लीवार, परसेवाडाचे सरपंच शंकर वेलादी, अग्गू राजान्ना, वेंकन्ना जाकावार, शैलेश पोन्नावार, राजू पुप्पालवार, राजाराम कावरे, स्वामी जाकावार उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी परिसरातील अनेक समस्या मांडून त्या सोडविण्याची मागणी केली.
बैठकीच्या यशस्वीतेसाठी स्वामी जाकावार, श्रीनिवास दुर्गे, वेंकटम्मा दुर्गे, पूनम पट्टेम, दिलीप आलम, समय्या दुर्गे, बापूराव पोरतेट, श्यामराव कोडापे, किसन गण्यारापू, महेश जाकावार, हनुमंतु दुर्गे, राजाराम कावरे, पापय्या कुम्मरी, समय्या दुर्गे यांनी सहकार्य केले. बैठकीला रेगुंठा परिसरातील सर्व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.