जिल्हा रूग्णालयातील पाणी समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 01:03 AM2018-03-28T01:03:14+5:302018-03-28T01:03:14+5:30

पाण्याअभावी जिल्हा सामान्य रूग्णालयातील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत असल्याचे वृत्त लोकमतने सोमवारी प्रकाशित केले होते. या वृत्ताची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत सोमवारी जिल्हा सामान्य रूग्णालय व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणी समस्या तत्काळ सोडवावी, असे निर्देश दिले.

Resolve the water problem of the District Hospital | जिल्हा रूग्णालयातील पाणी समस्या सोडवा

जिल्हा रूग्णालयातील पाणी समस्या सोडवा

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : लोकमतच्या वृत्तानंतर पाणी टंचाईचा घेतला आढावा

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : पाण्याअभावी जिल्हा सामान्य रूग्णालयातील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत असल्याचे वृत्त लोकमतने सोमवारी प्रकाशित केले होते. या वृत्ताची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत सोमवारी जिल्हा सामान्य रूग्णालय व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणी समस्या तत्काळ सोडवावी, असे निर्देश दिले.
मागील १५ दिवसांपासून जिल्हा सामान्य रूग्णालयात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. दुपारी ४ वाजतानंतर पिण्याचे पाणी सुध्दा राहत नाही. शौचालयामध्ये घाण निर्माण झाली असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयाचे अधिकारी व मुख्याधिकारी यांची बैठक घेतली. पाणी टंचाईची समस्या तत्काळ सोडविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी रूग्णालयात बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, न.प.च्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. नगर परिषद जादा पाणी पुरवठा करणार आहे. एमआयडीसी येथील पाणी पुरवठा योजना सुरू केली जाणार आहे. त्याचबरोबर महिला रूग्णालय ते जिल्हा रूग्णालयापर्यंत पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव पुन्हा सादर करण्याचे ठरविण्यात आले.

Web Title: Resolve the water problem of the District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.