शिबिरातच समस्या सोडविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2016 02:06 AM2016-10-22T02:06:23+5:302016-10-22T02:06:23+5:30
महसूल विभागाच्या वतीने शुक्रवारी महाराजस्व अभियान व जनता तक्रार दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रचंड प्रतिसाद : पारडी येथे महाराजस्व अभियान शिबिर
कोटगल/पारडी : महसूल विभागाच्या वतीने शुक्रवारी महाराजस्व अभियान व जनता तक्रार दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान प्रत्यक्ष नागरिक व अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे तेव्हाच समाधान करण्यात आले. या शिबिराला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद लाभला.
शिबिराचे उद्घाटन आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार संतोष खांडरे, संवर्ग विकास अधिकारी पचारे, जिल्हा परिषद सदस्य वर्षा कौशिक, विलास भांडेकर, प्रतिभा चौधरी, बंडू भोयर, नायब तहसीलदार खारकर, पारडी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय निखारे, माजी सरपंच वासुदेव निकुरे, वसंत म्हशाखेत्री, अशोक सोनुले, चंद्रशेखर मुडे, राजू मुनघाटे, दत्तू सुजपवार, भास्कर बोबडे उपस्थित होते.
समाधान शिबिरादरम्यान नागरिकांना प्रमाणपत्र, रेशनकार्ड, शैक्षणिक दाखले वितरित करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आ. डॉ. देवराव होळी यांनी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी शासन व प्रशासन अगदी प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन शिबिरादरम्यान केले. (वार्ताहर)