थाटरीतील शेतीशाळेत शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:39 AM2021-08-26T04:39:39+5:302021-08-26T04:39:39+5:30

शेती शाळेला मार्गदर्शक म्हणून कृषी सहायक किशाेर भैसारे उपस्थित हाेते. भैसारे यांनी पिकाच्या वाढीची अवस्था, फुलोरा अवस्था, वाढीच्या ...

Resolving the doubts of the farmers in the agricultural school in Thatari | थाटरीतील शेतीशाळेत शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन

थाटरीतील शेतीशाळेत शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन

googlenewsNext

शेती शाळेला मार्गदर्शक म्हणून कृषी सहायक किशाेर भैसारे उपस्थित हाेते. भैसारे यांनी पिकाच्या वाढीची अवस्था, फुलोरा अवस्था, वाढीच्या वेळेस येणाऱ्या अडचणी, तसेच लागवडीपासून तर काढणीपर्यंतच्या सर्व बाबी शेतीशाळेत सांगितल्या. वातावरणातील बदलामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने धान पिकावर दुष्परिणाम होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शास्त्रीय शेती पद्धतीची कास धरून अधिकाधिक उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन कृषी सहायक किशोर भैसारे यांनी शेती शाळेतून केले.

बाॅक्स

फवारणी करताना अशी घ्यावी काळजी

कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा टाळण्यासाठी सुरक्षा किटचा वापर करणे आवश्यक आहे. कीटकनाशके नोंदणीकृत कृषी केंद्रातूनच खरेदी करावी. फवारणीसाठी कीटकनाशकाची मात्रा मोजून घ्यावी, फवारणी करतांना संरक्षण कपडे, बूट, हातमोजे, चश्मा, टोपी, चेहऱ्यावर मास्कचा वापर करावा. कीटकनाशकाचा शरीराशी संपर्क आल्यास शरीर पाण्याने स्वच्छ धुवावे, फवारणी करताना तणनाशकाचा पंप कीटकनाशकाच्या फवारणीसाठी वापरू नये, नोझलचा कचरा तोंडाने फुंकू नये, फवारणी करते वेळी खाद्यपदार्थ किवा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करू नये, असे मार्गदर्शन कृषी सहायक भैसारे यांनी केले.

250821\img-20210825-wa0071.jpg

कीड व रोगाचा प्रादुर्भाव टाळून शास्त्रीय पद्धतीने शेती करावी फोटो

Web Title: Resolving the doubts of the farmers in the agricultural school in Thatari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.