चामोर्शीसह अहेरी उपविभागात संपाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 01:46 AM2018-08-08T01:46:39+5:302018-08-08T01:47:02+5:30
शासकीय कर्मचाऱ्यांनी ७ ते ९ आॅगस्ट यादरम्यान संप पुकारला आहे. या संपाच्या पहिल्या दिवशी चामोर्शी तालुक्यासह अहेरी उपविभागात कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील अनेक शिक्षक या संपात सहभागी झाल्याने शाळा ओस पडल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शासकीय कर्मचाऱ्यांनी ७ ते ९ आॅगस्ट यादरम्यान संप पुकारला आहे. या संपाच्या पहिल्या दिवशी चामोर्शी तालुक्यासह अहेरी उपविभागात कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील अनेक शिक्षक या संपात सहभागी झाल्याने शाळा ओस पडल्या होत्या. शिक्षक, महसूल, आरोग्य व इतर कर्मचारी संघटनांच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले.
जवळपास ९० टक्के शासकीय कर्मचारी संपात सहभागी झाल्याने शासकीय कार्यालयांमधील कामकाज ठप्प पडले होते. अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा या पाचही तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाºयांविना शुकशुकाट दिसून येत होता. अनेक कार्यालयांतील टेबल व खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या.
महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक समिती चामोर्शीच्या वतीने सदर संपाच्या पहिल्या दिवशी उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. जुनी पेंशन योजना व सातवा वेतन आयोग लागू करावा, ही प्रमुख मागणी करण्यात आली. यावेळी महाराष्टÑ राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे चामोर्शी तालुकाध्यक्ष दीपक पुंगाटी, सरचिटणीस सूजित दास, कार्याध्यक्ष सुरेश पालवे, सचिन गायधने, दिनेश वागले, विलास माळवे, किशोर कोडापे, धनंजय शेंडे, विजय करपते आदींसह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
अहेरी, मुलचेरा, भामरागड येथेही कर्मचाºयांच्या विविध संघटनांमार्फत संप पुकारण्यात आला. निदर्शने करण्यात आली. अनेक ठिकाणी कर्मचाºयांच्या निषेध सभाही पार पडल्या. यावेळी संघटनेच्या पदाधिकाºयांनी कर्मचाºयांविरोधी शासन धोरणावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची, धानोरा आदी पाच तालुक्यातही कर्मचाºयांकडून संपाला भरघोस प्रतिसाद मिळाला.
सदर संप यशस्वी करण्यासाठी संघटनांच्या वतीने गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्हा व तालुकास्तरावर नियोजन सभाही घेण्यात आल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून सदर संपात मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा संप यशस्वी करावा, असे आवाहन संघटनांच्या पदाधिकाºयांनी केले होते. बुधवारी व गुरूवारीही संपामुळे विविध कार्यालयातील प्रशासकीय कामकाज प्रभावित होण्याची शक्यता अधिक आहे. वरिष्ठ अधिकारी या संपाच्या घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत.