संघटना मजबूत करणे कार्यकर्त्यांची जबाबदारी

By admin | Published: July 8, 2016 01:27 AM2016-07-08T01:27:09+5:302016-07-08T01:27:09+5:30

कोणताही पक्ष कार्यकर्त्यांच्या आधारे मार्गक्रमण करीत असते. कार्यकर्ता हाच पार्टीचा केंद्रबिंदू असल्याने कार्यकर्ता हा प्रशिक्षीत असणे आवश्यक आहे.

The responsibility of the workers to strengthen the organization | संघटना मजबूत करणे कार्यकर्त्यांची जबाबदारी

संघटना मजबूत करणे कार्यकर्त्यांची जबाबदारी

Next

अम्ब्रीशराव आत्राम यांचे प्रतिपादन : कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग
मार्र्कंडा/चामोर्शी : कोणताही पक्ष कार्यकर्त्यांच्या आधारे मार्गक्रमण करीत असते. कार्यकर्ता हाच पार्टीचा केंद्रबिंदू असल्याने कार्यकर्ता हा प्रशिक्षीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कणा असलेला कार्यकर्ता हा नेतृत्वक्षम असला पाहिजे, त्या उद्देशाने हा प्रशिक्षण वर्ग आयोजित केला आहे. पूर्ण देशात प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या वर्गाचा आयोजन केले आहे. पक्ष संघटना मजबूत झाल्यास शासन यंत्रणा विकासाच्या दिशेने आगेकुच करेल, त्यासाठी कार्यकर्त्यांनी भारतीय परंपरा संस्कृती ही विचारधारेच्या आधारावर स्वीकार करण्याची तयारी ठेवावी, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
पंडीत दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते मार्र्कंडादेव येथे बोलत होते. या प्रशिक्षणाचे उद्घाटन भाजपचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, जिल्हामहामंंत्री रवींद्र ओल्लालवार, प्रमोद पिपरे, बाबुराव कोहळे, नाना नाकाडे, प्रकाश गेडाम, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, अनिल पोहणकर, प्रकाश अर्जुनवार, रामेश्वर सेलुकर, आनंद गण्यारपवार, सत्यनारायण मंचार्लावार, डॉ. भारत खटी, नंदू काबरा, विलास बल्लमवार, मनोज पालारपवार आदी उपस्थित होते. याप्रसंगी ना. अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले की, डॉ. शामप्रसाद मुखर्जी व पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारसरणीवर आधारीत उभा झालेला पक्ष मोठा करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांनी खंबीरपणे उभे राहावे व सरकारची उपलब्धी जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक प्रशिक्षण सेलचे प्रमुख प्रशांत भृगुवार, संचालन रवींद्र ओल्लालवार, तर आभार अनिल पोहणकर यांनी मानले. तीन दिवस हे प्रशिक्षण मार्र्कंडा येथे चालणार आहे. गडचिरोली, अहेरी व आरमोरी या तिन्ही विधानसभा क्षेत्रातील २०० कार्यकर्ते व स्थानिक स्वराज्य संस्थाचे भाजपचे प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी झाले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The responsibility of the workers to strengthen the organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.