मंदिराचा जीर्णाेद्धार संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 01:11 AM2019-03-06T01:11:31+5:302019-03-06T01:15:58+5:30
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथील मार्र्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णाेद्धाराच्या कामाला पुरातत्त्व विभागाच्या वतीने सुरूवात करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून मंदिराचे काम संथगतीने सुरू आहे.
संतोष सुरपाम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मार्र्कंडादेव : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथील मार्र्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णाेद्धाराच्या कामाला पुरातत्त्व विभागाच्या वतीने सुरूवात करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून मंदिराचे काम संथगतीने सुरू आहे. सध्यास्थितीत या मंदिराचे काम बंद असल्याचे दिसून येते. मंदिर जीर्णाेद्धाराच्या कामाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शिवभक्तांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
मार्र्कंडादेव येथे सुमारे बाराशे वर्षांपासून पुरातन शिवालय असून या मंदिर समूहाच्या जीर्णाेद्धाराचे काम २०१५ पासून हाती घेण्यात आले. सुरूवातीपासूनच या कामात गती नसल्याचे दिसून येत आहे. सदर मंदिर समूहात मुख्य मंदिरासह दशावतार मंदिर, गणेश, महाकालेश्वर, घृ्रणेश्वर, यमधर्म, मार्र्कंडऋषी, विठ्ठल-रूख्मिणी, शंकर, हनुमान आदींसह मंदिरांचा समावेश आहे. सदर मंदिरावर सुंदर रेखीव व कोरीव कला काढण्यात आली आहे. हे मंदिर कलाकुसरीने नटलेले आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने अजिंठा, वेरूळ लेणीच्या धर्तीवर सदर मार्र्कंडेश्वर मंदिराचा विकास करून शिवभक्तांना न्याय द्यावा, अशी मागणी भाविकांनी केली आहे.
१० कोटींचा निधी मंजूर
विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्टÑ गतीमान विकास उपाययोजना २०१८ अंतर्गत चामोर्शी तालुक्याच्या मार्र्कंडादेव येथील मार्र्कंडेश्वर देवस्थानच्या विकास कामासाठी राज्य शासनाने १० कोटींचा निधी आॅक्टोबर २०१८ मध्ये मंजूर केला आहे. सदर निधीतून विकास कामांचे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास मार्र्कंडाचे रूप पालटण्यास मदत होणार आहे.