ग्रामस्थांचा रेती वाहतुकीस मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 11:49 PM2017-11-08T23:49:25+5:302017-11-08T23:49:36+5:30

तालुक्यातील वैनगंगा नदीच्या कुरूड घाटावरून गावाच्या हम रस्त्यावरून ट्रक व टिप्परच्या सहाय्याने दिवसा व रात्री रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे.

Restraint of rural roads | ग्रामस्थांचा रेती वाहतुकीस मज्जाव

ग्रामस्थांचा रेती वाहतुकीस मज्जाव

Next
ठळक मुद्देरेती भरलेला टिप्पर अडविला : गावातील रस्त्यांवरून सुरू असलेल्या वाहतुकीस विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : तालुक्यातील वैनगंगा नदीच्या कुरूड घाटावरून गावाच्या हम रस्त्यावरून ट्रक व टिप्परच्या सहाय्याने दिवसा व रात्री रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. वारंवार सूचना करूनही ग्रामस्थांच्या या सूचनेकडे रेती कंत्राटदारांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रेतीची वाहतूक करणारा टिप्पर बुधवारी सकाळी ११.३० वाजता गावात अडविला. यापुढे गावातून रेती वाहतूक करण्यास ग्रामस्थांनी मज्जाव घातला. दरम्यान संबंधित रेती कंत्राटदाराने समायाचना केल्यानंतर रेती नेणाºया टिप्परला सोडण्यात आले.
कुरूड रेती घाटातून दिवसा व रात्री रेतीचा उपसा सुरू आहे. उपसा केलेल्या रेतीची वाहतूक गावातील रहदारीच्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात केली जात आहे. गावाच्या बाहेरून जाणाºया रस्त्याने रेतीची वाहतूक करावी, याबाबत ट्रक चालकांना तसेच रेतीघाट कंत्राटदारांना सूचना देण्यात आली. मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी रेती घेऊन जाणारा टिप्पर अडवून रेतीची वाहतूक थांबविली. सूर्यास्तानंतर रेतीची वाहतूक केल्यास कंत्राटदाराचे हे कृत्य गावकºयांकडून खपवून घेतले जाणार नाही. असे संबंधित कंत्राटदाराकडून वदवून घेण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, सरपंच मारोती मडावी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तुलाराम लाकडे, ग्रा.पं. सदस्य क्षितीज उके, विठ्ठल डोरे, विलास गोटेफोडे यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. ट्रक व टिप्परच्या सहाय्याने रेतीची गावातील अंतर्गत रस्त्यांवरून वाहतूक होत असल्याने रस्त्याची दुर्दशा होत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Restraint of rural roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.