सार्वजनिक कार्यक्रमांवर पुन्हा बंधने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:55 AM2021-02-23T04:55:15+5:302021-02-23T04:55:15+5:30
लग्न समारंभात ५० व अंत्यविधीकरिता २० पेक्षा जास्त व्यक्तींच्या उपस्थितीवर बंदी घालण्यात आली आहे. उपस्थित सर्व व्यक्तींनी मास्क घालून ...
लग्न समारंभात ५० व अंत्यविधीकरिता २० पेक्षा जास्त व्यक्तींच्या उपस्थितीवर बंदी घालण्यात आली आहे. उपस्थित सर्व व्यक्तींनी मास्क घालून सामाजिक अंतर पाळणे तसेच सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. घराबाहेर पडताना सर्वांनी मास्क घालणे बंधनकारक आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत पहिल्या भेटीत ५० रुपये दंड व दुसऱ्या भेटीत १०० रुपये दंड आकारला जाईल. २६ फेब्रुवारीनंतर २०० रुपये दंड आकारला जाईल, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
सभेला तालुका आराेग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, मुख्याधिकारी संजीव ओहाेड, ठाणेदार डी.डब्ल्यू. मंडलवार, बालविकास प्रकल्प कार्यालयाचे एन.आर. परांडे, एल.के. बेडके, यू.एन. राऊत, आर.जी. बेहरे, आर.बी. खाेब्रागडे, आर.एफ. राठाेेड उपस्थित हाेते.
प्रशासनाच्या वतीने साेमवारी सायंकाळी गडचिराेली शहरातून काेराेना प्रतिबंधात्मक जनजागृतीपर रॅलीही काढण्यात आली. त्यात अधिकारी सहभागी झाले होते.