सीबीएसई दहावीच्या तीन शाळांचा निकाल १०० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 11:02 PM2019-05-06T23:02:11+5:302019-05-06T23:02:29+5:30
गडचिरोली जिल्ह्यात सीबीएसई अभ्यासक्रमाच्या एकूण पाच शाळा आहेत. त्यापैकी तीन शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. कारमेल हायस्कूल गडचिरोलीची विद्यार्थिनी रिद्धी संजय संतोषवार ही जिल्ह्यातून प्रथम आली आहे. तिला ९७.४० टक्के गुण मिळाले आहेत. याच शाळेचा अश्विन धर्मेंद्र दुधे हा द्वितीय आला आहे. त्याला ९७.२० टक्के गुण आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सीबीएसई अभ्यासक्रमाच्या एकूण पाच शाळा आहेत. त्यापैकी तीन शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. कारमेल हायस्कूल गडचिरोलीची विद्यार्थिनी रिद्धी संजय संतोषवार ही जिल्ह्यातून प्रथम आली आहे. तिला ९७.४० टक्के गुण मिळाले आहेत. याच शाळेचा अश्विन धर्मेंद्र दुधे हा द्वितीय आला आहे. त्याला ९७.२० टक्के गुण आहेत. तर स्कूल आॅफ स्कॉलर्स येथील धनश्री भास्कर दोनाडकर ही तृतीय आली आहे. तिला ९७ टक्के गुण आहेत.
कारमेल हायस्कूल, गडचिरोली - या शाळेच्या एकूण ११९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २० विद्यार्थ्यांना ९० टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त झाले आहेत. १०० टक्के निकाल देण्याची परंपरा या शाळेने कायम राखली आहे. प्राचार्य फादर जिनस मॅथ्यू यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
स्कूल आॅफ स्कॉलर्स, गडचिरोली - या शाळेतून एकूण १०५ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यातील २६ विद्यार्थ्यांना ९० टक्केपेक्षा जास्त गुण आहेत. धनश्री दोनाडकर हिला एकूण ९७ टक्के गुण मिळाले असून ती विद्यालयातून प्रथम आली आहे. किसलय तेलसे याला ९६.६ टक्के गुण मिळाले आहेत. तो द्वितीय आहे. तर विनीत लभाणे याला ९६.४ टक्के गुण मिळाले असून तृतीय आला आहे. विनीत लभाने याला गणितात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. किसलय तेलसे, आश्लेषा कुकडे, तृप्ती कोहळे, आयश सहारे, अपूर्वा अरसोडे, आश्लेषा बोईवर, श्रेया तुम्मे या सात विद्यार्थ्यांना मराठीत १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. शाळेचे प्राचार्य निखील तुकदेव यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. विशेष म्हणजे दहाव्या वर्गाची ही नववी बॅच आहे. सलग नवव्या वर्षी या शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
कारमेल अॅकॅडमी, आमगाव - येथील दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. योगेशकुमार सुरेश साधवानी याला ९६ टक्के गुण मिळाले आहेत. मानस श्रीराम गहाणे याला ९५.८ टक्के, कशिश नरेंद्र मेश्राम हिला ९५.२ टक्के, विशाक विजय कराडे याला ९४.८ टक्के गुण मिळाले आहेत. शाळेचे मुख्याध्यापक फादर सी.सी. जॉर्ज यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. एकूण ९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. संपूर्ण विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
जवाहर नवोदय विद्यालय, घोट - या शाळेतील एकूण ७६ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सृष्टी रामटेके या विद्यार्थिनीला ९६ टक्के गुण मिळाले असून ती विद्यालयातून प्रथम, मधुबाला भैसारे याला ९२ टक्के तर मृणाली भागडकर हिला ९०.४ टक्के गुण मिळाले आहेत.
एकलव्य मॉडेल स्कूल, अहेरी स्थित गडचिरोली - एकलव्य मॉडेल स्कूलमधून ४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा निकाल ४२ टक्के लागला आहे. प्रियंका गजू सडमेक हिला ७२.४, नितेश सिडाम याला ५९.२ टक्के गुण मिळाले.