दोनाडकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:09 AM2021-03-04T05:09:01+5:302021-03-04T05:09:01+5:30
याप्रसंगी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, पतसंस्थेचे अध्यक्ष राजकुमार पारधी, उपाध्यक्ष रमेश बोरकुटे, सचिव पेशने, जि.प.कर्मचारी ...
याप्रसंगी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, पतसंस्थेचे अध्यक्ष राजकुमार पारधी, उपाध्यक्ष रमेश बोरकुटे, सचिव पेशने, जि.प.कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपुरकर, नवलाजी घुटके, निलेश जवंजाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. उमेशचंद्र चिलबुले यांनी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी निलकंठ दोनाडकर यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या कर्तव्यनिष्ठतेबद्दल उपस्थितांना माहिती दिली. १९८६ च्या काळात गडचिरोली जिल्ह्यात रस्ते, दळणवळणाच्या सुविधा, भ्रमणध्वनी सारख्या सुविधा उपलब्ध नसतानाही धानोरा, एटापल्ली, चामोर्शी, मुलचेरा, आरमोरी, कुरखेडा तालुक्यातील दुर्गम भागात परिवाराला आरमोरी येथे वास्तव्यास ठेवून सेवा दिली. ज्या ठिकाणी बदली झाली त्या ठिकाणी प्रामाणिकपणे सेवा दिली असेही ते म्हणाले. याप्रसंगी निलिमा दोनाडकर व प्रा. प्रशांत दोनाडकर सत्काराप्रसंगी उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक राजु पारधी व आभार नवलाजी घुटके यांनी मानले.