शरद ब्राम्हणवाडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:37 AM2021-01-25T04:37:23+5:302021-01-25T04:37:23+5:30

गडचिराेली : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पाेलीस पाटील संघ तालुका शाखेच्यावतीने स्थानिक पाेलीस ठाण्यात २१ जानेवारीला पाेलीस पाटील दिन ...

Retirement felicitation of Sharad Bramhanwade | शरद ब्राम्हणवाडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार

शरद ब्राम्हणवाडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार

Next

गडचिराेली : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पाेलीस पाटील संघ तालुका शाखेच्यावतीने स्थानिक पाेलीस ठाण्यात २१ जानेवारीला पाेलीस पाटील दिन तथा निराेप समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमात सेवानिवृत्त पाेलीस पाटील शरद ब्राम्हणवाडे यांना निराेप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे जिल्हा सचिव मुरारी दहिकर हाेते. उद्घाटन पाेलीस निरीक्षक दामदेव मंडलवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पाेलीस निरीक्षक शरद मेश्राम, धानाेराच्या लता उईके, तालुकाध्यक्ष काशिनाथ जेंगठे उपस्थित हाेते. कार्यक्रमात पाेलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद ब्राम्हणवाडे यांचा सपत्निक शाल, श्रीफळ व साडीचाेळी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर काेठारे, प्रास्ताविक पंडित मेश्राम यांनी केले तर तुलाराम राऊत यांनी आभार मानले. यावेळी बहुसंख्य पाेलीस पाटील उपस्थित हाेते.

Web Title: Retirement felicitation of Sharad Bramhanwade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.