वर्षभरात १६ कोटींचा महसूल

By admin | Published: April 16, 2017 12:32 AM2017-04-16T00:32:29+5:302017-04-16T00:32:29+5:30

राज्य सरकारने गडचिरोलीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी सर्व प्रकारच्या करामधून एकूण ११ कोटी ८९ लाख रूपयांच्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट दिले होते.

Revenue of 16 crores a year | वर्षभरात १६ कोटींचा महसूल

वर्षभरात १६ कोटींचा महसूल

Next

आरटीओ विभाग मालामाल : उद्दिष्टांपेक्षा अधिक कर वसूल
दिलीप दहेलकर गडचिरोली
राज्य सरकारने गडचिरोलीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी सर्व प्रकारच्या करामधून एकूण ११ कोटी ८९ लाख रूपयांच्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. मात्र गडचिरोलीच्या आरटीओ कार्यालयाने उद्दिष्टापेक्षा अधिक कर वसुली करीत तब्बल १६ कोटी ६७ लाख ४७ हजार रूपयांचा महसूल वर्षभरात मिळविला आहे. मिळालेल्या महसुलाची टक्केवारी १४०.२० आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला नव्या वाहनांची नोंदणी, नुतनीकरण, मोटर वाहन कर तसेच वाहनांचे तडजोड शुल्क तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनावर आकारलेला दंड तसेच विना परवाना वाहनावर दंडात्मक कारवाई आदीसह तत्सम बाबीतून महसूल मिळत असतो. आरटीओ कार्यालयाला आयएमव्ही शुल्कातून एकूण ३१४.५२ लाख, बीएमव्ही शुल्कापोटी १३३०.३४ लाख रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
आरटीओ कार्यालयाला सर्व प्रकारचे कर मिळून फेब्रुवारी २०१७ अखेर १४३०.६७ लाख रूपयांचा महसूल प्राप्त झाला होता. दुचाकी व चारचाकी वाहन परवाना काढण्यासाठी संबंधित उमेदवारांकडून शुल्क आकारले जाते. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चार, पाच वर्षांपासून नव्या दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे परवाना, नोंदणी व इतर शुल्काच्या माध्यमातून आरटीओ कार्यालयाचा महसूलही वाढत आहे.

क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या चालकांकडून ५० लाखांचा दंड वसूल
क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने कारवाई केली जाते. सन २०१६-१७ या वर्षात आरटीओ कार्यालयामार्फत क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या एकूण ९४८ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २४० वाहने दोषी आढळून आली आहे. २१२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच वर्षभरात २४० वाहने जप्त करण्यात आली. क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणाऱ्या २१२ प्रकरणातून आरटीओ कार्यालयाने ५० लाख २४ हजार १६३ रूपयांची दंडात्मक वसुली केली आहे. यामध्ये ३२ लाख ५६ हजार २०० रूपये तडजोड शुल्क व १७ लाख ६७ हजार ९६३ रूपयांच्या विभागीय कारवाई अंतर्गत तडजोड शुल्काचा समावेश आहे.

ध्वनी प्रदूषण तपासणीतून साडेआठ लाख
धावत्या वाहनाच्या धुरामुळे ध्वनी प्रदुषण होऊन याचा परिणाम माणसाच्या प्रकृतीवर होतो. त्यामुळे अधिक प्रदुषण करणाऱ्या वाहनावर आरटीओ कार्यालयामार्फत कार्यवाही केली जात आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३ हजार २८२ वाहनांची ध्वनी प्रदुषण तपासणी करण्यात आली. यामध्ये १ हजार २६ वाहने दोषी आढळून आली. या संदर्भात ९१९ प्रकरणे निकाली काढण्यात आले असून या माध्यमातून ८ लाख ५२ हजार रूपयांच्या तडजोड शुल्काची वसुली करण्यात आली.

वायूवेग पथकाकडून १७२.७२ लाख वसूल
अवैध प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या तसेच विना परवाना वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी आरटीओ कार्यालयाच्या वायू वेग पथकाद्वारे केली जाते. वायू वेग पथकाला शासनाने सन २०१६-१७ या वर्षात ८४.९६ लाख रूपयांचा उद्दिष्ट दिले होते. वायूवेग पथकाने उद्दिष्टापेक्षा अधिक कारवाई करीत १७२.७२ लाख रूपयांचा महसूल प्राप्त केला आहे. यामध्ये गृहराज्यातून ७२.८१ लाख व इतर राज्यातून ९९.९१ लाख रूपये महसूलाचा समावेश आहे.

अवैध प्रवासी वाहतुकीतूनही वसुली
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोलीच्या वतीने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एकूण ५१ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये चार वाहनांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक आढळून आली. दोषी आढळलेल्या तीन वाहन चालकांकडून ६८ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Web Title: Revenue of 16 crores a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.