महसुली खर्चाला कात्री

By admin | Published: July 18, 2016 02:06 AM2016-07-18T02:06:10+5:302016-07-18T02:06:10+5:30

गडचिरोली पालिका प्रशासनाने गतवर्षी सन २०१४-१५ मध्ये आस्थापनेवरील महसुली खर्च ८१ टक्के केला होता.

Revenue cutter scissors | महसुली खर्चाला कात्री

महसुली खर्चाला कात्री

Next

बचत : पालिकेच्या आस्थापना खर्चात आठ टक्क्यांनी घसरण
दिलीप दहेलकर गडचिरोली
गडचिरोली पालिका प्रशासनाने गतवर्षी सन २०१४-१५ मध्ये आस्थापनेवरील महसुली खर्च ८१ टक्के केला होता. तर सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात पालिका प्रशासनाने ७३.१४ टक्के आस्थापनेवरील महसुली खर्च केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पालिकेच्या महसुली खर्चात तब्बल आठ टक्क्यांनी घसरण झाली आहे. यामुळे पालिकेच्या निधीची बचत झाली.
गडचिरोली नगर पालिकेकडे सर्वसाधारण मालमत्ता करामधून सन २०१५-१६ वर्षात २ कोटी ५० लाख ८१ हजार ८०८ रूपये जमा होते. तर ४९ लाख ३६ हजार ४९१ रूपये मालमत्ता, उपयोगीता सेवा व कर आकारणीतून प्राप्त झाले. गुंतवणुकीवरील व्याज, पालिका सहायक अनुदान व इतर अनुदानातून ८ कोटी ५० लाख ६९ हजार ८८६ रूपये व जुने शिल्लक मिळून एकूण १२ कोटी ३ लाख ७४ हजार रूपये जमा होते. भांडवली जमा व प्रारंभिक शिल्लक मिळून पालिकेकडे एकूण २८ कोटी ४२ लाख ४ हजार ६४८ रूपये जमा होते. तसेच तात्पुरत्या जमा रक्कमेचे मिळून गडचिरोली पालिकेकडे एकूण ५ कोटी ८२ लाख ३४ हजार ४०४ रूपये जमा होते.
या रक्कमेतून पालिकेने सन २०१५-१६ वर्षात सामान्य प्रशासनाच्या बाबीवर ४८ लाख १५ हजार ६८२, लेखी व अंदाजपत्रकावर ३ लाख ३२ हजार तसेच कर, भांडार खरेदी, निवृत्ती वेतन व उपदाने मिळून एकूण १ कोटी १ लाख ८ हजार ७७९ रूपयांचा खर्च केला. सामाजिक सुरक्षिततेच्या बाबीवर ११ लाख २२ हजार ६०९ रूपये तर आरोग्य व पाणी पुरवठ्याच्या सुविधेवर ६० लाख ३९ हजार ६४० रूपयांचा खर्च पालिकेने वर्षभरात केला. अभिलेख कक्ष विभागावर ७ लाख ३५ हजार, जन्म, मृत्यू नोंदणीवर ४ लाख २७ हजार, दारिद्र्य निर्मुलन व महिला बाल कल्याणच्या बाबीवर ५ लाख ८३ हजार, नगररचना विभागाच्या कामावर ४ लाख ७० हजार ७९७ रूपये खर्च केला. कोंडवाडा, जनावरांचे खाद्य खरेदीवर ३ लाख ४१ हजार ७२८, सार्वजनिक उद्यानाच्या बाबीवर १७ लाख १२ हजार ८८९, बांधकामाच्या विविध बाबीवर ३७ लाख २ हजार रूपयांचा खर्च वर्षभरात करण्यात आला आहे. शिक्षण विभागाच्या विविध बाबींवर वर्षभरात ३ कोटी २९ लाख १८ हजार ५५० तर कर्जावरील व्याज, राष्ट्रीय कार्यक्रम निवडणूक, खर्च, वैद्यकीय प्रतिपूर्ती बिल, दावे, खटले प्रकरण, जाहिरात, टेलिफोन बिल, अतिथी भत्ता व इतर बाबीवर ८ लाख ९० हजार रूपयाचा खर्च झाला.

रूग्णवाहिका सेवेवर पाच लाखांचा खर्च
पालिकेच्या अ‍ॅम्ब्युलन्स विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवेच्या विविध बाबींवर वर्षभरात एकूण ५ लाख ८ हजार ३५९ रूपयांचा खर्च करण्यात आला. यामध्ये रोजंदारी कर्मचाऱ्याच्या मानधनावर २ लाख ३३ हजार ८८०, पेट्रोल खरेदीवर १ लाख ४७ हजार ७६८, वाहन दुरूस्तीवर २८ हजार ९८७ रूपयांचा खर्च करण्यात आला. तसेच गडचिरोली पालिका प्रशासनाने कर्जावर रूग्णवाहिकेची खरेदी केली आहे. या वाहन खरेदी कर्जाच्या परतफेडीवर पालिकेने ९७ हजार ७२४ रूपयांचा खर्च केला.
नाली स्वच्छतेसाठी ३१ लाख ६८ हजार लागले
गडचिरोली नगर पालिकेच्या वतीने शहरातील २३ वार्डातील नाली स्वच्छतेच्या कामावर सन २०१५-१६ या वर्षभरात एकूण ३१ लाख ६८ हजार ४९४ रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. यामध्ये साफसफाई गाड्यांची खरेदी व देखभालीवर २८ हजार ३४१, पाणपोईवर ३९ हजार ४८०, फिनाईल, मलेरिया आॅईल खरेदीवर ३६ हजार, वाहनांचे टायर ट्युब व बॅटरी खरेदीवर १ लाख ७३ हजार ८८४, कचरा गाड्या खरेदी व दुरूस्तीवर ६ हजार ३२५, स्वर्गरथ डिझेल व इतर बाबीवर ८६ हजार, दुर्बल घटकांच्या अंत्यसंस्काराच्या लाकडे खरेदीवर ३१ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला. मैला टँकर दुरूस्ती व डिझेल खरेदीवर ६ हजार ३२५ रूपयांचा खर्च वर्षभरात करण्यात आला.

आर्थिक वर्षाच्या प्रारंभी पालिकेकडे २७ कोटी ७१ लाख शिल्लक
पालिका प्रशासनाकडे सन २०१५-१६ वर्षाच्या सुरूवातीला सन २०१४-१५ वर्षातील एकूण १६ कोटी ३४ लाख ४७ हजार २१९ रूपयांचा निधी शिल्लक होता. सन २०१५-१६ वर्षात २९ कोटी ९३ लाख ६५ हजार ८४३ असे मिळून एकूण ४६ कोटी २८ लाख १३ हजार ६२ रूपयाचा निधी जमा झाला. सन २०१५-१६ वर्षात १८ कोटी ५६ लाख ३८ हजार रूपये खर्च झाले असून वर्षाअखेर २७ कोटी ७१ लाख ७४ हजार रूपये शिल्लक होते.

 

Web Title: Revenue cutter scissors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.