महसूल कर्मचाऱ्यांकडून रॉयल्टीची तपासणी
By admin | Published: January 6, 2017 01:38 AM2017-01-06T01:38:18+5:302017-01-06T01:38:18+5:30
मागील दोन महिन्यांपासून गोदावरी नदीच्या विविध घाटावरून रेतीचा उपसा करून ट्रक सिरोंचावरून हैदराबादकडे पाठविले जात आहे.
५० कोटी रूपयांचा महसूल जमा : परप्रांतात जाणाऱ्या ट्रकवर नजर
सिरोंचा : मागील दोन महिन्यांपासून गोदावरी नदीच्या विविध घाटावरून रेतीचा उपसा करून ट्रक सिरोंचावरून हैदराबादकडे पाठविले जात आहे. सिरोंचा तहसील कार्यालयाच्या कोतवाल व मंडळ अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला ठाण मांडून या ट्रकचालकांकडून रॉयल्टी तपासणीचे काम हाती घेतले आहे.
सिरोंचा तालुक्यात सन २०१६-१७ या वर्षात एकूण नऊ रेती घाटांचे लिलाव करण्यात आले. नगरम येथे एक, नगरम दोन, मद्दिकुंटा, कोटामाल, वडधम, अंकिसा एकूण सहा रेती घाटवर उत्खनन सुरू आहे. परंतु सिरोंचा तालुक्यात रेती घाटामुळे हा महसूल विभाग यंदा जिल्ह्यात उत्पन्नात आघाडीवर आहे. सिरोंचा तालुक्याला आतापर्यंत ५० कोटी रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. येथून परप्रांतात मोठ्या प्रमाणावर वाहन जात असल्याने त्याची तपासणी मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे हे ट्रक जातात. त्या मार्गावर टेबल लावून प्रशासनाचे अधिकारी सध्या बसलेले आहेत. (प्रतिनिधी)