महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:17 AM2019-08-29T00:17:45+5:302019-08-29T00:18:18+5:30

गडचिरोली येथील तहसीलदारांना निवेदन देताना महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, कार्याध्यक्ष वनीश्याम येरमे, सरचिटणीस गौरीशंकर ढेंगे, संघटक अल्पेश बारापात्रे, कोषाध्यक्ष विशाल खरवडे, दयाराम मेश्राम आदीसह महसूल कर्मचारी उपस्थित होते.

Revenue personnel movement started | महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू

महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू

Next
ठळक मुद्देमागण्यांचे निवेदन : ३१ ला एकदिवसीय लाक्षणिक संप, तर ५ सप्टेंबरपासून बेमुदत संप

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी कर्मचाºयांचे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दरम्यान मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देऊन २८ आॅगस्ट रोजी बुधवारी सामूहिक रजेवर जात असल्याचे नमूद करण्यात आले.
गडचिरोली येथील तहसीलदारांना निवेदन देताना महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, कार्याध्यक्ष वनीश्याम येरमे, सरचिटणीस गौरीशंकर ढेंगे, संघटक अल्पेश बारापात्रे, कोषाध्यक्ष विशाल खरवडे, दयाराम मेश्राम आदीसह महसूल कर्मचारी उपस्थित होते.
आंदोलनात सरचिटणीस विजय करपते, अर्चना वडेट्टीवार, सोनाली कांकलवार, देवा निकुरे, नाना ठाकरे, ललित लांडे, अमोल गव्हारे, प्रकाश पुपलवार, धीरज जुमनाके, महेश चुनरकर, दुष्यांत कोवे, नितीन स्वाईमुल, पियूष आखाडे, एस.डी.बारसिंगे, मनोज मेहनदडे, सुभाष देहरकर, ओम रेहपडे, विलास तुपाठ, गोपाल वेलादी, श्याम दहिकार, आशिष पोरडीवर, उत्पल खेवले, महादेव मेश्राम आदी उपस्थित होते.
३१ आॅगस्ट रोजी सर्व महसूल कर्मचारी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारणार आहेत. याच दिवशी रक्तदान करून शासनाचा निषेध करणार आहे, तसेच ५ सप्टेंबरपासून कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Revenue personnel movement started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.