शैक्षणिक प्रगतीचा आढावा

By Admin | Published: June 10, 2017 01:50 AM2017-06-10T01:50:27+5:302017-06-10T01:50:27+5:30

शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे विषय साधन व्यक्तींची सभा गुरूवारी घेण्यात आली.

A review of the academic progress | शैक्षणिक प्रगतीचा आढावा

शैक्षणिक प्रगतीचा आढावा

googlenewsNext

डायटमध्ये सभा : डिसेंबर २०१७ पर्यंत सर्व शाळा प्रगत करण्याचे उद्दिष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे विषय साधन व्यक्तींची सभा गुरूवारी घेण्यात आली. या सभेत जिल्हाभरातील शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
आढावा सभेचे अध्यक्ष डायटचे प्राचार्य रवींद्र रमतकर होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ अधिव्याख्याता धनंजय चापले, सचिन चव्हाण, डॉ. नरेश वैद्य, शिक्षक सहाय्यक डॉ. विजय रामटेके, कुणाल कोवे, विठ्ठल होंडे, पाटील, संजू बिडवाईकर उपस्थित होते. सभेदरम्यान जिल्हाभरातील डीजिटल शाळांची स्थिती, प्रगत शाळा, कृती संशोधन आराखडा, प्रशिक्षणाचा अनुधावन, गणित संबोध प्रशिक्षण व नियोजन, सांघिक शाळाभेट अहवाल, गृहभेटी अहवाल, स्पोकन इंग्लिश, मासिक नियोजन व दैनंदिनी आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डिसेंबर २०१७ अखेर जिल्ह्यातील सर्वच शाळा प्रगत करण्यासाठी कृती कार्यक्रमााद्वारे प्रभावी नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी विषय साधन व्यक्ती चांगदेव सोरते यांना पुस्तिका देऊन प्राचार्य रवींद्र रमतकर, प्रा. धनंजय चापले यांच्या हस्ते गौरविण्यात आले. शेवटच्या मुलापर्यंत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठीही प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मार्गदर्शन डायटचे प्राचार्य रवींद्र रमतकर यांनी सभेदरम्यान केले.

 

Web Title: A review of the academic progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.