गडचिराेलीतील शिक्षकांच्या समस्यांचा पुण्यात आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:43 AM2021-09-10T04:43:50+5:302021-09-10T04:43:50+5:30
यावेळी शिक्षक भारती संस्थापक आ. कपिल पाटील, माध्यमिक राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, प्राथमिक राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख ...
यावेळी शिक्षक भारती संस्थापक आ. कपिल पाटील, माध्यमिक राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, प्राथमिक राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाहक जालिंदर सरोदे, राज्य उपाध्यक्ष धनाजी पाटील, राज्य सरचिटणीस भरत शेलार, राज्य उपाध्यक्ष दिनेश खोसे, महिला राज्याध्यक्ष स्वाती बेंडभर, शिवाजी खुडे, नागपूर विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे, प्रकाश ब्राह्मणकर, गडचिरोली जिल्हाध्यक्ष पुंडलिक देशमुख, कार्याध्यक्ष अमरदीप भुरले, उपाध्यक्ष गुरुदेव सोमनकर सर्व राज्य कार्यकारिणी पदाधिकारी, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शिबिराच्या पहिल्या दिवशी शिक्षण व शिक्षकांचे कर्तव्य, सध्याची शिक्षणाची परिस्थिती व आपली भूमिका, घटना व लोकशाही परिस्थिती, शैक्षणिक व सामाजिक चळवळी याविषयी व्याख्यान व परिसंवाद सकाळच्या सत्रात आयोजित करण्यात आले होते. पहिल्या दिवशी रात्री व शिक्षक दिनाच्या दिवशी आ. कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनात शिक्षक भारती माध्यमिक व शिक्षक भारती प्राथमिक यांची संयुक्त आढावा बैठक झाली. प्रत्येक जिल्ह्यातील संघटनेचा आढावा स्वतंत्ररीत्या यावेळी घेण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या जिल्हा व राज्य प्रतिनिधी यांनी आपापल्या जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्या मांडल्या, त्या साेडविण्यासाठी चर्चा करण्यात आली.
शिक्षक भारती जिल्हा शाखा गडचिरेालीच्या वतीने आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्यरत असेपर्यंत शिक्षक व कर्मचारी यांना प्रोत्साहनपर एकस्तर वेतनश्रेणी विनाअट देण्यात यावी, जून २०२० मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सेवासमाप्ती झालेल्या अप्रशिक्षित ३८ शिक्षकांना सेवासातत्य देण्यात यावे, १३ ऑक्टोबर २०१६ च्या शासन परिपत्रकातील एकतृतीयांशची अट रद्द करून सर्व पदवीधर शिक्षकांना पदवीधर प्राथमिक शिक्षकांची वेतनश्रेणी देण्यात यावी. या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांची मांडणी गडचिरोली जिल्हाध्यक्ष पुंडलिक देशमुख यांनी केली.
बाॅक्स
राज्यस्तरीय प्रश्न साेडविण्यासाठी नियाेजन
राज्यस्तरीय प्रश्न आ. कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासन स्तरावर पाठपुरावा करून सोडविले जात आहेत, त्यांचे योग्य नियोजन करण्यात येऊन पुढील दिशा ठरविण्यात आली. यात प्रामुख्याने सर्वांना जुनी पेन्शन, डीसीपीएस/एनपीएस त्रुटी, याअंतर्गत मयत शिक्षक कर्मचाऱ्यांना मिळणारा सानुग्रह निधी, पूर्वीच्या वस्तीशाळा शिक्षकांची जुनी सेवा, १ जानेवारी २००४ पूर्वी नियुक्त शिक्षक व कर्मचारी यांची वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी त्रुटी, सर्व पदवीधर यांना १०० टक्के पदवीधर वेतनश्रेणी, बीडीएस प्रणाली, सीएमपी वेतन प्रणाली, आदिवासी भागातील एकस्तर, आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत बदलीमधील समस्या साेडविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.