अर्थ व वनमंत्र्यांनी घेतला जिल्ह्याच्या प्रश्नांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 11:55 PM2018-11-29T23:55:57+5:302018-11-29T23:57:57+5:30
राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील विकास कामांना गती द्यावी, अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील विकास कामांना गती द्यावी, अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी केल्या.
याप्रसंगी खा.अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, वनविभागाचे सचिव तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गडचिरोली येथील जिल्हा क्रीडांगणाच्या कामास केंद्र सरकारची तत्वत: मान्यता मिळाली असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. चामोर्शी येथील तालुका क्रीडा संकुलाच्या जागेसाठी भूसंपादन करून हे काम गतीने पूर्ण करावे, अशा सूचना वनमंत्र्यांनी उपस्थित सचिव व अधिकाºयांना दिल्या. गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठासाठी आवश्यक असलेली जागा, चामोर्शी शहरातील बसस्थानक इमारतीचे काम आदीसह जिल्ह्यातील विविध कामांचा ना.मुनगंटीवार यांनी आढावा घेतला.
येत्या ३० जानेवारी २०१९ रोजी गडचिरोलीमध्ये जिल्ह्यातील या सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी बैठक आयोजित करण्यात येईल, असे ना.मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. गडचिरोली जिल्ह्याच्या विविध विकास कामातील अडथळे दूर करून सर्व विकास कामे गतीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी वनविभागाच्या सचिवांना दिले. यावेळी खा.नेते, आ.डॉ.होळी यांनी त्यांच्याशी चर्चा केली.