उपवनसंरक्षकांकडून कामाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 11:28 PM2018-01-07T23:28:46+5:302018-01-07T23:29:01+5:30

जंगलालगत असणाऱ्या गावातून जळाऊ लाकडासाठी होणारी वृक्षतोड थांबविण्याकरिता अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबांना सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर पुरवठा वन विभागाकडून केला जातो.

Review of the work from the garden supervisors | उपवनसंरक्षकांकडून कामाचा आढावा

उपवनसंरक्षकांकडून कामाचा आढावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : जंगलालगत असणाऱ्या गावातून जळाऊ लाकडासाठी होणारी वृक्षतोड थांबविण्याकरिता अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबांना सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर पुरवठा वन विभागाकडून केला जातो. त्याच धरतीवर बीपीएल ओबीसी कुटुंबांना गॅस सिलिंडर पुरवून वृक्षतोड थांबविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती वडसाचे उपवनसंरक्षक व्ही. एम. गोडबोले यांनी दिली.
वैरागड येथे कामाचा आढावा गोडबोले यांनी घेतला. याप्रसंगी त्यांनी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले. बेस स्टेशनचा वापर कार्यालय म्हणून होत आहे. तेव्हापासून आरएफओ कार्यालय कुलूपबंद आहे, अशी माहिती क्षेत्र सहायक ए. व्ही. मेश्राम यांनी उपवनसंरक्षक गोडबोले यांना दिली. यावेळी सहायक उपवनसंरक्षक कैदलवार, आरएफओ नरेंद्र चांदेवार, श्रीकांत सेलोटे व कर्मचारी हजर होते.

Web Title: Review of the work from the garden supervisors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.